कोपरगाव ग्रामीण रुग्णालय अवघड प्रसुती करून वाचविले आई व बाळाचे प्राण..

कोपरगाव ग्रामीण रुग्णालय अवघड प्रसुती करून वाचविले आई व बाळाचे प्राण..

Kopargaon Rural Hospital saved the life of mother and baby by performing a difficult delivery.

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onTue 25 April23 ,18.20 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव : रिटा देवी व दिपक कुशवाल हे जोडपे पाणीपुरीच्या व्यवसाया निमित्य कर्नाटक मध्ये शाहपुर मध्ये राहतात, ते मुळचे झाशी उत्तर प्रदेश या गांवचे, रिटा देवी ९ महीण्याची गरोदर होती, दोन बाळातपणे सिजरीयन करून झाली होती, पहीले बाळ मृत्यु पावले होते, ही तिची तिसरी खेप होती, 

सदर जोडपे कर्नाटक एस्कप्रेस रेल्वे ने मुळ गावी जाण्या साठी कर्नाटक शाहपुर मधुन उत्तर प्रदेश झाशी येथे दि २१ तारखेस सकाळी चार वाजता निघाले, कोपरगांव च्या अलिकडे तिला प्रसूतीच्या तिव्र वेदना सुरु झाल्या, सदर जोडपे कोपरगांव रेल्वे स्थानकावर  दुपारी तीन वाजता उतरले, इथली काहीच माहीती त्यांना नव्हती, रिक्षा वाल्याने त्या जोडप्याला एका खाजगी रुग्णालयात सोडले, बाळंतपण अवघड असल्याकारणाने, त्यांनी ग्रामीण रुग्णालय कोपरगांव येथे तातडीने पाठवले, रुग्णालयाने तिला तात्काळ ऍडमिट केले, स्टाफने त्या महिलेची तपासणी केली असता बाळ पायाळु होते, बाळाने पोटात शि केली होती, बाळाचे ठोके नॉर्मल पेक्षा जास्त होते बाळांतपनांच्या कळा तिव्र होत्या, वैद्यकिय अधिक्षक डॉ. सचिन यादव, डॉ. कृष्णा फुलसौंदर व सिस्टर इंचार्ज श्रीमती कल्पना धाकराव यांनी त्वरीत निर्णय घेऊन स्त्रीरोग तज्ञ डॉ. योगेश लाडे, भुलतज्ञ डॉ. विजय कर्डीले बालरोग तज्ञ डॉ. अतिश काळे यांना बोलाऊन घेऊन इर्मजन्सी सिझेरियन सेक्शन करून सुखरूप बाळांतपण पार पाडले, तिसरे सिझेरीयन असल्याने अजुन तासभर उशिर झाला असता तर… आई व बाळाला धोका निर्माण झाला असता तात्काळ उपचार मिळाल्याने बाळ व बाळातीन सुखरूप असुन ग्रामीण रुग्णालय कोपरगांव येथे उपचार घेत आहेत…

Leave a Reply

You cannot copy content of this page