“आम्हाला आंदोलन  करायला लावु नका” ; सुमित कोल्हे यांनी सांबाला भरला सज्जड दम

…”आम्हाला आंदोलन  करायला लावु नका” ; सुमित कोल्हे यांनी सांबाला भरला सज्जड दम

वृत्तवेध ऑनलाईन 27 जुलै 2020
By: Rajendra Salkar, 18.56

कोपरगाव : संजीवनी फाउंडेशनचे सचिव सुमित कोल्हे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला सज्जड दम भरला असून प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एखाद्या निरपराध व्यक्तीचा जीव गेला तर तो खपवुन घेतला जाणार नाही, असं स्पष्ट शब्दात सुनावले आहे .

नगर-मनमाड महामार्गावरील खड्डे

सुमित कोल्हे म्हणाले, नगर-मनमाड माझ्या समोर साईबाबा काॅर्नर वरील मोठ्या खड्यात मोटर सायकल स्वाराचा अपघात झाला. अनेक ठिकाणी या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत. अनेकदा निवेदने दिली, मात्र काम होत नाही.  मात्र महामार्गावरील खड्डे बुजवण्यात हलगर्जीपणा होत असल्याची बाब गंभीर असून रस्ते दुरुस्तीतील हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही.

सध्या करोना महामारीचे संकट आहे, त्यामुळे प्रशासनावर ताण आहे. परंतु टोल कंपनी जर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिपत्याखाली आहे तर त्यांच्याकडून आपण कामे का करून घेत नाही ? असा सवाल ही  सुमित कोल्हे यांनी केला.

मागील तीन दिवसांपुर्वी सौ. सिंधुताई शंकरराव कोल्हे यांचे वाढदिवसा मिमित्ताने साईबाबा काॅर्नर लगत वृक्षारोपन चालु असताना तेथे खड्यात दुचाकी स्वाराचा अपघात झाला. यावेळी सुमित कोल्हे तेथेच होते. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रशांत वाकचौरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सदर रोड जागतिक प्रकल्प बॅन्केच्या अखत्यारीत येत असल्याचे सांगीतले. यावर पुढील पाठपुरावा केल्यानंतर फक्त किरकोळ मुरूम टाकुन साईबाबा काॅर्नरवरील खड्डे बुजविण्यात आले. मात्र मुरूम पावसाने वाहुन जावुन पुन्हा खड्डे जैसे थे झाले. या बाबीची दखल घेत सुमित कोल्हे यांनी वाकचौरे यांच्या कार्यालयास भेट देवुन तेथे श्री वाकचौरे व सार्वजनिक बांधकाम विभाग, येवलाचे अभियंता श्री देवरे यांच्याशी संवाद साधुन नगर मनमाड रस्त्या अंतर्गत साईबाबा काॅर्नर ते आंचलगाव फाटा आणि साईबाबा काॅर्नर ते पुणतांबा फाटा या मार्गावरील खड्डे बुजविणे, रस्त्यावरती सोलर काटाईज लावणे, गरज असेल तेथे थर्मोप्लास्ट पट्टे आखणे व सर्व साई पट्यांची कामे करणे अभिनय करण्यात यावा अशी मागणी केली.

Leave a Reply

You cannot copy content of this page