संजीवनी इंजिनिअरिंग मध्ये राज्यपातळीवरील ‘टेक्नोवेशन 2023’ स्पर्धा संपन्न 

संजीवनी इंजिनिअरिंग मध्ये राज्यपातळीवरील ‘टेक्नोवेशन 2023’ स्पर्धा संपन्न 

State level ‘Technovation 2023’ competition concluded in Sanjeevani Engineering

संजीवनीकडून स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन तर स्पर्धा विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा आविष्कारExcellent planning of the competition by Sanjeevani while the competition is the brainchild of the students

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onThu 27 April23 ,16.00 Pm By राजेंद्र सालकर

 कोपरगाव : इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स (आयईईई) बॉम्बे सेक्शन पुरस्कृत महाराष्ट्र राज्यातील सहा विभागांच्या राज्य पातळीवरील ‘टेक्नोवेशन 2023’ या स्पर्धेत  विद्यार्थ्यांनी सहभागी होत 80 प्रोजेक्ट सादर करून कल्पकतेचा आविष्कार सादर केला. या तांत्रिक प्रदर्शनाच्या  स्पर्धा  संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये नुकत्याच संपन्न झाल्या.यानिमित्ताने वैविध्यपूर्ण अशा संकल्पना आणि प्रोजेक्टचे  सादरीकरण करण्यात आले.  

मानवतेच्या फायद्यासाठी तांत्रिक नवसंकल्पना आणि उत्कृष्टता  वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कलागुणांना वाव मिळण्यासाठी  ही स्पर्धा आयोजित केली जाते  त्यानुसार यंदाच्या ‘टेक्नोवेशन 2023’स्पर्धेचा बहुमान कोपरगावच्या संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्च्या संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजला मिळाला. 
अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, लातुर आणि नांदेड या जिल्ह्यातील इंजिनिअरींग काॅलेज मधिल विध्यार्थ्यांच्या गटांनी प्रथम फेरीच्या प्रदर्शनात  सहभाग नोंदविला. यात ८० प्रोजेक्टसचा समावेश  होता यातुन ४ बेस्ट प्रोजेक्टस् निवडण्यात आले. यापुर्वीच जळगांव, पुणे, नागपुर, शेगांव व मुंबई  विभागात घेण्यात आलेल्या पहिल्या फेरीच्या प्रदर्शनातून  निवड झालेले एकुण २४ प्रोजेक्टस व येथे पहिल्या फेरीत निवड झालेले चार प्रोजेक्टस या सर्वांची दुपारच्या सत्रात अंतिम सादरीकरण झाले.
अंतिम सादरीकरणात थाडोमल शहानी इंजिनिअरींग काॅलेज, बांद्रा,मुंबईने प्रथम विजेते पद मिळविले. गोदावरी काॅलेज ऑफ इंजिनिअरींग, जळगांव व सिंबाॅयसिस इन्स्टिटयूट ऑफ  टेक्नाॅलाॅजी, पुणे या संस्थांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला. विद्यालंकार इन्स्टिटयूट ऑफ  टेक्नाॅलाॅजी, वडाळा, मुंबई या संस्थेला उत्तेजनार्थ बक्षिस मिळाले.  
माजी मंत्री व संजीवनी ग्रुप ऑफ  इन्स्टिट्यूट्सचे  संस्थापक स्व. शंकरराव  कोल्हे यांना विध्यार्थ्यांनी नाविण्याचा ध्यास घेवुन मानवतेच्या कल्याणासाठी नवनवीन प्रोजेक्ट करावेत अशी कायम इच्छा असायची. म्हणुन संजीवनीच्या वतीने दरवर्षी  प्रोजेक्ट विजेत्यांना  त्यांच्या स्मृति प्रित्यर्थ रू २५ हजारांची रोख बक्षिसे देण्यात आली, अशी  माहिती संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
 स्पर्धेचे उदघाटन आयईईई, बाॅम्बे सेक्शन  चेअरमन श्री आनंद घारपुरे यांच्या अध्यक्षतेखाली व आयईईई, बाॅम्बे सेक्शनचे स्टुडन्टस अँक्टिव्हिटी चेअरमन प्रा. दत्तात्रय सावंत, टाटा इन्स्टिट्यूट्स ऑफ  फंडामेंटल रिसर्च संस्थेचे सिनिअर सायंटिस्ट डाॅ. बी. सत्यनारायणा, इंजिनिअरींग काॅलेजचे डायरेक्टर डाॅ. ए. जी. ठाकुर, इलेक्ट्राॅनिक्स विभागाचे प्रमुख डाॅ. बी. एस. आगरकर, इलेक्ट्राॅनिक्स अँड  काॅम्प्युटर विभागाचे प्रमुख डाॅ. सेबॅस्टिअन जाॅर्ज, येथिल आयईईईच्या प्रतिनिधी साक्षी नेहे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी  श्री घारपुरे व प्रा सावंत यांनी उत्कृष्ट  नियोजनाबध्दल संजीवनी इंजीनियरिंग  बध्दल गौरवोद्गार काढले.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष श्री नितिन कोल्हे यांनी राज्य स्तरीय स्पर्धांचे अतिशय शिस्तबध्द आयोजन केल्याबध्दल संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या सर्व टीमचे अभिनंदन केले. मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी बक्षिस वितरण कार्यक्रमाला हजेरी लावुन सर्व विजेत्या संघांचे व सर्व सहभागी संघांचेही अभिनंदन केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page