पाणीपुरवठा योजनांच्या कामात हलगर्जीपणा चालणार नाही -आ.आशुतोष काळे
Laxity in the work of water supply schemes will not work – A. Ashutosh Kale
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onThu 27 April23 ,16.10 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव : मतदार संघात सुरू असलेल्या अनेक गावातील रेंगाळलेल्या पाणी पुरवठा योजनांचे काम तातडीने पूर्ण करा. पाणीपुरवठा योजनांच्या कामात हलगर्जीपणा चालणार नाही अशी स्पष्ट ताकीद आमदार आशुतोष काळे यांनी प्राधिकरण व जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना पाणी योजनांच्या कामाच्या आढावा बैठकीत दिली
यावेळी आ.आशुतोष काळे यांनी मतदार संघातील जिल्हा परिषद अंतर्गत मंजूर असलेल्या ३३ पाणीपुरवठा योजना व महाराष्ट्र जिवन प्राधिकरण अंतर्गत चास नळी, कुंभारी,कोळपेवाडी, मळेगाव थडी, मायगाव देवी, रवंदे, रुई-शिंगवे, शिंगणापूर, सुरेगाव,वारी-कान्हेगाव,जेवूर कुंभारी, पुणतांबा, रांजणगाव देशमुख, धारणगाव तसेच पिंपळवाडी-नपावाडी पाणी पुरवठा योजनेचा देखील आढावा घेतला. अधिकाऱ्यांना सूचना करतांना ते म्हणाले की,रेंगाळलेल्या पाणी पुरवठा योजनांच्या कामांना गती देवून सुरळीतपणे कामे सुरू करा.कामांची गुणवत्ता वर्क ऑर्डर प्रमाणे होत असल्याची वेळच्या वेळी खात्री करा.ज्या पाणी पुरवठा योजनांच्या वर्क ऑर्डर देवून देखील अद्याप काम सुरू झाले नाही त्या ठेकेदारांना तातडीने नोटिसा देवून लवकरात काम सुरू करा.सर्व नागरिकांना नळाच्या माध्यमातून पाणी पोहोचेल योजनेचा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून वाड्या वस्त्यांवरील नागरिकांना नळाद्वारे कायमस्वरूपी पाणी पुरवठा होईल अशा पद्धतीने नियोजन करून पाणी पुरवठा योजनांचे काम लवकरात लवकर पूर्ण करा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, दिलीप बोरनारे, सुधाकर रोहोम, राहुल रोहमारे, अनिल कदम, श्रावण आसने, गोरक्षनाथ जामदार, अर्जुन काळे, मधूकर टेके, धरमचंद बागरेचा, बाबुराव थोरात, राजेंद्र औताडे, नंदकिशोर औताडे, गोपीनाथ रहाणे, सुनील कुहिले, लक्ष्मण थोरात, नानासाहेब नेहे, महेंद्र वक्ते, बापूसाहेब वक्ते, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी प्रशांत कदम, शेखर मिटकरी, पंचायत समिती बांधकाम विभागाचे संतोष दळवी, बाळासाहेब साबळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता चांगदेव लाटे तसेच सर्व शाखा अभियंता उपस्थित होते.