संजीवनी अभियांत्रिकीचा अन्सारी इंटर्नशिपसाठी तैवान विद्यापीठात – अमित कोल्हे                                                       

संजीवनी अभियांत्रिकीचा अन्सारी इंटर्नशिपसाठी तैवान विद्यापीठात – अमित कोल्हे

 Ansari of Sanjeevani Engineering at Taiwan University for Internship – Amit Kolhe

       

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 2 May23 ,18.00 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगांव : संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या  इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाच्यावतीने तृतिय वर्षातील  मोहम्मद अनस अन्सारी याची  दोन महिन्यासाठी जागतीक क्रमांक ७७ व्या  नॅशनल तैवान युनिव्हर्सिटीमध्ये शिष्यवृत्तीसह  निवड झाल्याची  माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात श्री कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की विध्यार्थ्यांना आधुनिक ज्ञान प्राप्तीसाठी तसेच एम.एस. सारखे अभियांत्रिकीमधिल उच्च शिक्षण शिष्यवृत्तीसह जगातील नामांकित विद्यापीठामध्ये  घेता यावे, यासाठी संजीवनीमध्ये स्वतंत्र इंटरनॅशनल रिलेशन्स डीपार्टमेंटची स्थापना करण्यात आली आहे. या विभागामार्फत  अन्सारीची तैवान मधिल विद्यापीठात इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे, ही या विभागाची मोठी उपलब्धी आहे. असेही ते म्हणाले 
 
इंटरनॅशनल रिलेशन्स या विभागाला दिवसेंदिवस चांगले यश मिळत असल्याबध्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष  नितिन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी  समाधान व्यक्त केले यावेळी अमित कोल्हे यांनी अन्सारी व त्याच्या  वडिल अनस अन्सारी यांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला.
 यावेळी डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकुर, इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाचे डीन डॉ. महेंद्र गवळी, विभाग प्रमुख डॉ. डी. बी. क्षिरसागर उपस्थित होते.

प्रतिक्रिया

इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाने नॅशनल तैवान  विध्यापीठाच्या निकषांप्रमाणे  माझ्याकडून तयारी करून घेतली. मला कॉलेजमधुन मिळालेल्या 5 जी टेक्नॉलॉजीचा चांगला फायदा झाला. कोपरगाव सारख्या ग्रामीण भागातून आंतरराष्ट्रीय  विद्यापीठाशी जोडलो गेलो याचा मला अभिमान आहे.’- मोहम्मद अन्सारी

 

Leave a Reply

You cannot copy content of this page