शहापूरच्या दोन सख्या  घारे बहिणी पुणे शहर  पोलीस दलात ; स्नेहलता  कोल्हेकडून  सत्कार

शहापूरच्या दोन सख्या  घारे बहिणी पुणे शहर  पोलीस दलात ; स्नेहलता  कोल्हेकडून  सत्कार

Two Ghare sisters from Shahapur in Pune city police force; Greetings from Snehlata Kolhe

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 2 May23 ,18.10 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : तालुक्यातील शहापूर येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील गायत्री बाबासाहेब घारे आणि अश्विनी बाबासाहेब घारे या दोन्ही सख्ख्या बहिणीची पुणे शहर पोलीस दलात   पोलिस कॉन्स्टेबलपदी निवड झाली हे  आई-वडिलांच्या कष्टाचे सार्थक आहे  त्यांनी केलेल्या कठोर परिश्रमाचे कौतुक करत माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी या दोन्ही सख्या भगिनींचा सत्कार केला.

स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की,  सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. अशा काळात ग्रामीण भागातील मुला-मुलींनी मनात कसलाही न्यूनगंड न बाळगता जिद्द व अभ्यासात सातत्य ठेवून प्रयत्न करावेत.गायत्री घारे व अश्विनी घारे या दोन्ही भगिनींनी कोपरगाव तालुक्याचा लौकिक वाढविला आहे. या दोघी बहिणींनी मिळविलेले यश ग्रामीण भागातील तरुण-तरुणींसाठी प्रेरणादायी आहे, शेवटपर्यंत प्रयत्न करा, यश नक्कीच प्राप्त होईल, असा मोलाचा मंत्र  त्यांनी यावेळी  दिला. 
दरम्यान, बहादराबाद (ता.कोपरगाव) येथील राजेंद्र चांगदेव पाचोरे यांची कन्या कु.प्रतीक्षा  पाचोरे हिची पिंपरी चिंचवड पोलिस दलात पोलिस कॉन्स्टेबलपदी निवड हिचाही सत्कार करून  शुभेच्छा दिल्या.
गायत्री घारे आणि कु. अश्विनी घारे या दोघी शहापूर (ता. कोपरगाव) येथील शेतकरी बाबासाहेब घारे यांच्या कन्या असून, त्यांच्या घरची परिस्थिती अतिशय बिकट आहे. गायत्री घारे व अश्विनी घारे या दोघींनी पोलिस दलात भरती होण्याचे स्वप्न पाहिले आणि जिद्द व कठोर परिश्रमाच्या बळावर हे स्वप्न साकार केले. या दोघींच्या स्वप्नपूर्तीसाठी त्यांच्या आई-वडिलांनीही मोलाची साथ दिली. त्यांच्या यशामध्ये त्यांच्या आई-वडिलांचाही मोलाचा वाटा आहे.
याप्रसंगी पोहेगाव पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीन औताडे, नितीन पाचोरे,  विक्रम पाचोरे, प्रवीण घारे, भाऊसाहेब घारे, अमोल घारे, दत्तात्रय पाचोरे, सागर घारे, सतीश घारे, वसंत घारे, अप्पासाहेब घारे, अविनाश घारे, समाधान डांगे, अभिजीत पाचोरे, गणेश खंडीझोड, अण्णासाहेब खंडीझोड, शरद पाचोरे, रवींद्र घारे, राहुल घारे आदी उपस्थित होते. 

चौकट

 सर्वसामान्य व शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींना उच्च शिक्षणासाठी तसेच स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी संजीवनी उद्योग समूह व कोल्हे परिवाराच्या वतीने नेहमीच मदत केली जाते. यापुढील काळातही त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, स्नेहलता कोल्हे 

Leave a Reply

You cannot copy content of this page