रणधुमाळी:कोपरगाव बाजार समितीसाठी ९३.६९ टक्के मतदान‎.; शेतकरी विकास पॅनलला १८ पैकी १५ जागेवर विजयी

रणधुमाळी:कोपरगाव बाजार समितीसाठी ९३.६९ टक्के मतदान‎.; शेतकरी विकास पॅनलला १८ पैकी १५ जागेवर विजयी

Randhumali: 93.69 percent voting for Kopargaon Bazaar Committee.; Farmer Development Panel won 15 out of 18 seats

  कोल्हे  गटाला सहा जागा, काळे गटाला पाच जागा, परजणे  व औताडे गटाला प्रत्येकी दोन जागा, तर अपक्ष तीन जागा  Kolhe group has six seats, Kale group has five seats, Parjane and Utade groups have two seats each, and independents have three seats.

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onSun 30 April23 ,21.00 PmBy राजेंद्र सालकर

कोपरगाव : तालुक्यातील कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार‎ समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया‎ सुरू आहे.  सकाळी आठ ते सायंकाळी चार‎ वाजेपर्यंत ९३.६९ टक्के मतदान झाले. कोपरगाव कृषी बाजार समितीवर काळे कोल्हे परजणे औताडे शेतकरी विकास पॅनल १५ सदस्य निवडून आले आहेत व्यापारी व आडते दोन उमेदवार व हमालमापाडी एक उमेदवार असे तीन  अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले आहेत. कदम मीरा सर्जेराव यांना सर्वाधिक ११४७ मते मिळाली तर सर्वात कमी मते साळुंखे रामचंद्र नामदेव ४७ मते मिळून विजयी, रविवारी रात्री उशिरापर्यंत मोजणी‎ सुरू होती.‎

रविवारी (३०) रोजी सकाळी मतदानाला आठ वाजता सुरुवात झाली . शेवटच्या दोन तासात दुपारी चार वाजेपर्यंत सर्व केंद्रावर सोसायटी -१३१२ (९२.८५%), सोसायटी मतदार संघात १०१ जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला नाही. ग्रामपंचायत- ७२६ (९३.१९%), ग्रामपंचायत मध्ये ५३ जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला नाही  व्यापारी/ आडते -१९६ (९८.९८%), दोन व्यापाऱ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला नाही,तर हमाल / मापाडी – मतदार संघात सर्वोच्च सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याने ८६ (१००%) इतके मतदान झाले होते. एकूण कोपरगाव कृषी  समिती साठी  एकूण २४७६  इतके मतदान होते पैकी  २३२० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला तर १५६ मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली  त्यामुळे   सात ही मतदान केंद्रावर ९३.६९% इतके मतदान  शांततेत पार पडले अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी नामदेव ठोंबळ यांनी दिली.
रविवारी (३०) रोजी सकाळी मतदानाला आठ वाजता सुरुवात झाली पहिल्या दोन तासात  सकाळी दहा वाजेपर्यंत सर्व मतदान केंद्रावर झालेले मतदान सोसायटी -११४ (८%), ग्रामपंचायत -५० (८%), व्यापारी/ आडते -२१ (११%), हमाल / मापाडी २६ (३१%), इतके मतदान झाले होते. दुपारी बारा वाजेपर्यंत सर्व मतदान केंद्रावर सोसायटी -७४६ (५३%),  ग्रामपंचायत -३५८ (५०%), ,व्यापारी/ आडते -५७(२६%), हमाल / मापाडी -७० (८२%) इतके मतदान झाले होते दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व मतदान केंद्रावर मिळून ८८.०८ % इतके   पडले होते. 
मतदानानंतर पीपल्स बँकेच्या शेजारील हॉलमध्ये सायंकाळी पाच वाजेनंतर   मतमोजणी  हाती घेण्यात आली. उशिरापर्यंत‎ मतमोजणी सुरू होती.
बाजार समितीच्या १८ जागापैकी सोसायटी मतदार संघ  भटक्या जाती विमुक्त जमाती रामदास भिकाजी केकाण बिनविरोध (काळे गट), ग्रामपंचायत मतदार संघ दुर्बल घटक नवले अशोक सोपान बिनविरोध (औताडे गट) ग्रामपंचायत मतदार संघ अनुसूचित जाती जमाती मोकळ रावसाहेब रंगनाथ कोल्हे गट ) या तीन जागा माघारी नंतर बिनविरोध झाल्या होत्या त्यामुळे उर्वरित १५ जागेसाठी  मतदान पार पडले 
 
 

 १५ विजयी उमेदवार सोसायटी मतदार संघ सर्वसाधारण (पुरुष) एकूण मतदान १३१२ अवैध मते ७१ वैध मते १२४१  पैकी विजयी उमेदवाराला पडलेली मते  पुढील प्रमाणे

 गोर्डे बाळासाहेब गंगाधर (कोल्हे गट) (पडलेली मते ९४०),देवकर शिवाजी बापूराव (काळेगट) (पडलेली मते ९६७),

परजणे गोवर्धन बाबासाहेब (काळेगट)(पडलेली मते १०९८),रोहोम  साहेबराव किसन (कोल्हे गट)(पडलेली मते १११२),

लामखडे साहेबराव शिवराम (कोल्हे गट)

(पडलेली मते ११०३),शिंदे लक्ष्मण विश्वनाथ (परजणे गट) (पडलेली मते ११०५),शिंदे संजय माधवराव (काळेगट)   (पडलेली मते १०८३),

सोसायटी मतदारसंघ (महिला राखीव) कदम मिरास सर्जेराव (औताडे गट) (पडलेली मते ११४७), डांगे माधुरी विजय (कोल्हे गट) (पडलेली मते ११३१)

सोसायटी मतदारसंघ (मागासवर्ग) फेपाळे खंडू पुंजा (परजणे गट),(पडलेली मते १११०),

ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघ गोर्डे प्रकाश नामदेव (कोल्हे गट) (पडलेली मते ६३१),निकोले राजेंद्र शंकर (काळेगट) (पडलेली मते ६०८),

व्यापारी आडते मतदार सांगळे ऋषिकेश मोहन(पडलेली मते १०६), निकम रेवणनाथ श्रीरंग(पडलेली मते ६९)

हमाल मापाडी मतदारसंघ साळुंके रामचंद्र नामदेव(पडलेली मते ४७)

 कोपरगाव बाजार समितीच्या १८ जागांपैकी  सोसायटी सर्वसाधारण मतदार संघ पुरुष महिला राखीव व मागासवर्ग १० जागा पैकी कोल्हे गट चार , काळेगट तीन , परजणेगट दोन औताडे एक  उमेदवार विजयी, ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघात एक जागा काळे गटाला एक जागा कोल्हे गटाला  व्यापारी आडते दोन्ही जागा अपक्ष व हमाल मापाडी एक जागा अपक्ष तर बिनविरोध झालेल्या जागेपैकी एक जागा काळे गटाला एक जागा कोल्हे गटाला   तर एक जागा औताडे गटाकडे आहे. १८ जागांपैकी बदाबलाचा विचार करता  कोल्हे गटाला सहा जागा काळे गटाला पाच जागा परजणे व औताडे गटाला प्रत्येकी दोन जागा असे बलाबल आहे
या‎ निवडणुकीत आजी व माजी‎ आमदार,  तसेच‎ स्थानिक नेते सक्रीय दिसले. आरोप‎ प्रत्यारोपांनी गाजलेल्या निवडणुकीत‎ स्थानिक पातळीवर पक्षीय जोडे  बाजुला सोडल्याचे‎ दिसले.‎ ३ जागा आधीच बिनविरोध‎ झाल्या होत्या. 
काळे, कोल्हे, परजणे व औताडे विरुद्ध  उद्धव ठाकरे शिवसेना काँग्रेस व इतर अशी लढत होती. निवडणुकीत‎ खासदार सदाशिव लोखंडे फारसे सक्रीय‎ नव्हते. निवडणकीत एकमेकांचे पारंपारिक विरोधक असलेले‎ आमदार आशुतोष काळे  व माजी आमदार यांचेकडून विवेक कोल्हे, राजेश परजणे व नितीन औताडे  यांनी एकीची मोट बांधल्यामुळे निवडणुकीत फारशी रंगत आली नाही परंतु, उद्धव ठाकरे शिवसेना,  काँग्रेस व इतर यांनी मात्र  जोर लावला. तालुका पिंजून काढला.‎
राज्यात महाविकास आघाडी विरूद्ध‎ भाजप असे चित्र असले तरी कोपरगाव कृषी‎ उत्पन्न बाजार समितीत भाजप व राष्ट्रवादी एकत्र‎ दिसली सोयीचे‎ राजकारण करून जुळवाजुळव दिसली.‎  उद्धव ठाकरे शिवसेनेचा  एक‎ गट  व परजणे गट राष्ट्रवादी भाजपसोबत गेला.‎

Leave a Reply

You cannot copy content of this page