थॅलिसेमिया रुग्णांसाठी रक्तदान करणे व रक्तदान शिबीर घेणं आवश्यक -विवेक कोल्हे
Donating blood and taking blood donation camp is necessary for thalassemia patients -Vivek Kolhe
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 9 May23 ,19.10 Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : थॅलेसेमिया हा रक्ताशी संबंधित एक गंभीर आजार आहे ज्यामध्ये शरीर हिमोग्लोबिन तयार करणे थांबवते. हा आजार पालकांपासून मुलांपर्यंत पोहोचतो. याबाबत फारशी जनजागृती नसल्याने व शासकीय रुग्णालयात याची तपासणी होत नसल्याने हे थांबविणे कठीण होत आहे. सध्या रक्ताच्या तुटवड्यामुळे थॅलेसेमियाचे रुग्ण अडचणीत आले आहेत. प्रत्येकाने रक्तदान करण्याचे आवाहन संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, युवा नेते विवेक कोल्हे यांनी केले. तसेच स्वयंसेवी संस्था व संघटनांनी रक्तदान शिबिरांच्या आयोजनासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे ही ते म्हणाले ,
दरवर्षी ८ मे रोजी आंतरराष्ट्रीय थॅलेसेमिया दिन साजरा केला जातो. या निमित्ताने मंगळवारी (९ मे) रोजी व्यापार धर्मशाळा येथे संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
प्रारंभी कर्मवीर भाऊराव पाटील, महाराणा प्रताप व स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी कोपरगाव तालुक्यातील साडेपाचशे रक्तदात्यांची माहिती पुस्तिकेचे प्रकाशन विवेक कोल्हे यांंनी केले रक्तदात्यांना त्यांच्या हस्ते गौरवपत्रही प्रदान करण्यात आले.
विवेक कोल्हे पुढे म्हणाले की ,
थॅलेसेमियाच्या रुग्णांमध्ये सतत वाढ होत असून, ही चिंताजनक बाब आहे. ‘एचपीएलसी’ चाचणीद्वारे थॅलेसेमिया या गंभीर आजारासह मूल जन्म घेणार आहे किंवा नाही, याचे खात्रीशीर निदान होऊन शकते. त्यामुळे अशा प्रकारच्या चाचण्या सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये व्हायला हव्यात. त्यासाठी सरकारने धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. लग्नापूर्वी तरुण-तरुणींनी थॅलेसेमियाची चाचणी करणे आवश्यक आहे,
डॉ. नीता पाटील यांनी थॅलेसेमियाबाबत सविस्तर माहिती दिली.
याप्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात, शहराध्यक्ष दत्ता काले, राजेंद्र सोनवणे, स्वप्नील निखाडे, योगेश बागुल, अशोक लकारे, वैभव गिरमे, विवेक सोनवणे, अल्ताफ कुरेशी, रवींद्र रोहमारे, दीपक जपे, वैभव आढाव, प्रसाद आढाव, सुदर्शन पटेल, विनोद गलांडे, सतीश रानोडे, खलिक कुरेशी, राजेंद्र बागुल, मुकुंदमामा काळे, सचिन सावंत, कानिफनाथ गुंजाळ, विशाल गोर्डे, विक्रांत सोनवणे, प्रमोद संवत्सरकर, रवींद्र लचुरे, प्रशांत संत, सागर राऊत, रोहन दरपेल, अनिकेत थोरात, विक्रांत खर्डे, सतीश निकम, योगेश वाघ आदींसह भाजप, भाजयुमोचे पदाधिकारी, कार्यकर्ते, संजीवनी ब्लड बँकेचे कर्मचारी, संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक व रक्तदाते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व प्रास्ताविक युवा सेवक सिद्धार्थ साठे यांनी केले, तर युवा सेवक रोहित कनगरे यांनी आभार मानले.
Post Views:
112