कोपरगाव बाजार समितीच्या सभापती-उपसभापतीपदी कुणाची वर्णी?
Kopargaon Bazar Committee Chairman-Deputy Chairman post of whom?
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 10 May23 ,19.00 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव : कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काळे कोल्हे परजणे औताडे पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेलला बहुमत मिळाल्याने या पॅनेलचे सर्वेसर्वा हे आ आशुतोष काळे व कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे ठरविणार आहेत
त्यामुळे सभापती व उपसभापतिपदाची माळ काळे कोल्हे कोणाच्या गळ्यात घालणार यावरून तालुक्यातील गावागावात भाकिते वर्तवली जात आहेत.
बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनेलचे नेतृत्व काळे कोल्हे परजणे औताडे यांनी केलं.१८ पैकी १५ जागी विजय मिळवून सत्ता घेतली.
या पार्श्वभूमीवरच बाजारसमितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी अनेकांनी फिल्डींग लावण्यास सुरूवात केली आहे. मात्र, यांच्यापैकी कुणाच्या गळ्यात सभापती आणि उपसभापती पदाची माळ पडणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, सभापती आणि उपसभापतीपदी कुणाला संधी द्यायची? हे आमदार आशुतोष काळे व युवा नेते विवेक कोल्हे ठरविणार आहेत
सभापती व उपसभापती या पदाच्या निवडीकरीता सहाय्यक निबंधक नामदेव ठोंबळ यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दिनांक १८ रोजी सकाळी १०-३० वाजता कृषि उत्पन्न बाजार समिती मुख्य कार्यालयातील राजे छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संचालक मंडळ सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
निवडणुक कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील
सभेचे काम सुरु करणे,नामनिर्देशन पत्र वाटप / स्विकृती नामनिर्देशन पत्र छाननी,वैध नामनिर्देशन पत्राची यादी प्रसिद्ध करणे. नामनिर्देशन पत्र माघार.
अंतीम उमेदवारांची यादी जाहीर करणे.मतदान प्रक्रिया.वेळ सकाळी १०.३० ते बारा वाजेपर्यंत मतमोजणी प्रक्रिया, निवडुण आलेल्या पदाधिका-यांबाबत निकाल घोषीत करणे आदी प्रक्रिया होतील.
चौकट
काळे व कोल्हे यांनी बाजार समिती सभापतीचे पद अडीच अडीच वर्षासाठी वाटून घेतल्याचे बोलले जात आहे त्यामुळे आता पहिला सभापती कोणत्या गटाचा होणार याचीच मोठी उत्सुकता शेतकऱ्यांना आहे
Post Views:
298