अधिकाऱ्यांनावाचविण्यासाठी शेतकऱ्याचा बळी देऊ नका -आ. आशुतोष काळे
Don’t sacrifice the farmer to name the authorities. Ashutosh Kale
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 10 May23 ,19.10 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव : अस्मानी संकटाला न घाबरता खरिपाच्या तयारीला लागलेल्या शेतकऱ्याला दर्जेदार बियाणे आणि खते मुबलक द्या, अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी शेतकऱ्याचा बळी देऊ नका अशा सक्त सूचना आ आशुतोष तोष काळे यांनी खरीप आढावाच्या बैठकीत कृषी अधिकाऱ्यांना दिल्या.
आ आशुतोष काळे यांनी बुधवारी 10 मे रोजी तहसील कार्यालयात कृषी अधिकाऱ्यासमोर समवेत त्यांनी खरीप आढावा व नियोजन बैठक घेतली
यावेळी आ आशुतोष काळे म्हणाले अवेळी झालेल्या पावसामुळे काढणीला आलेल्या कांदा पिकाचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी अत्यंत अडचणीत आहे.अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या आशा खरीप हंगामाकडे लागल्या आहेत. त्यामुळे या खरीप हंगामात बियाणे व खतांमुळे शेतकऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची कृषी विभागाने काळजी घ्यावी. बोगस बियाणांपासून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी तपासणी मोहीम राबवावी. खरीप हंगामात सोयाबीन, मका, कपाशी, बाजरी आदी बियाणांची कमतरता जाणवणार नाही याची खबरदारी घेवून शेतकऱ्यांना आवश्यक बियाणे वेळेत उपलब्ध होतील याची खबरदारी घ्यावी.
शासकीय योजनांचा लाभ सर्व समावेशक राहील यासाठी शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन करून जनजागृती करा. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे एकाही शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही त्यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना आ. आशुतोष काळे यांनी कृषी विभागाला दिल्या आहेत.
टंचाई व आपत्ती व्यवस्थापन बैठकी बाबतच्या सूचना सर्व विभागांना देण्यात आल्या आहेत. त्याबाबत लवकरात लवकर बैठक घेवून पावसाळ्यापूर्वी योग्य नियोजन करण्याच्या सूचना देखील आ. आशुतोष काळे यांनी सबंधित विभागाला यावेळी दिल्या.
चौकट :- महाडीबीटी योजनेच्या थकीत अनुदानाचे प्रस्ताव तातडीने सादर करा.महाडीबीटी योजनेतून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सोलर वीज पंप अतिवृष्टीचे अनुदान मिळणे गरजेचे असून त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. – आ. आशुतोष काळे.
यावेळी तहसीलदार विजय बोरुडे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, संगमनेरचे कृषी अधिकारी गोविंद कुलाळ, नायब तहसीलदार श्रीमती मनीषा कुलकर्णी, श्रीमती शोभा गोरे, सचिन चांदगुडे, राहुल रोहमारे, अनिल कदम, शिवाजीराव घुले, शंकरराव चव्हाण, रामदास केकाण, खंडू फेफाळे, दिलीप शिंदे, संजय संवत्सरकर, भास्करराव सुराळे, सरपंच शशिकांत वाबळे,सरपंच अनिल दवंगे, सामाजिक कार्यकर्ते संजय काळे, राजेंद्र खिलारी, गणेश घुमरे, गणेश घाटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नानासाहेब रणशुर, कृषी सेवा केंद्र संघटनेचे अध्यक्ष सागर कवडे, सहाय्यक गटविकास अधिकारी बाळासाहेब साबळे, सर्व मंडल कृषी अधिकारी, तलाठी, मंडलाधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, शेतकरी मित्र, आत्मा कमिटीचे सदस्य, तालुका शेतकरी समन्वयक, कृषी विमा कंपनी प्रतिनिधी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.