येसगावच्या विकासासाठी नेहमी अग्रेसर राहू-विवेक कोल्हे  

येसगावच्या विकासासाठी नेहमी अग्रेसर राहू-विवेक कोल्हे  

Vivek Kolhe will always be the leader for the development of Yesgaon

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 10 May23 ,19.20 PmBy राजेंद्र सालकर

कोपरगाव : दिवंगत राष्ट्रपती  डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त आदर्श गाव येसगाव संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे.  विकासाच्या बाबतीत नव्हे तर धार्मिक व इतर क्षेत्रातही येसगाव यापुढेही नेहमी अग्रेसर रहावे. यासाठी जी काही मदत लागेल ती कोल्हे परिवार व संजीवनी उद्योग समुहाकडून दिली जाईल, अशी ग्वाही सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे 

 कारखान्याचे अध्यक्ष  विवेक कोल्हे यांनी येसगाव येथे मंगळवारी दिली.

 येसगाव येथे ओम श्री साई ग्रुप  श्री साई सच्चरित्र महापारायण व संगीतमय साई कथामृत सोहळा समाप्ती  श्रीक्षेत्र सराला बेटाचे मठाधिपती  ह.भ.प. रामगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. 
  ह.भ.प. अरुण महाराज रोहोम कारवाडीकर यांच्या सुमधुर वाणीतून श्री साई संगीतमय कथा श्रवणाचा लाभ भाविकांनी घेतला.  सांगता सोहळ्यानिमित्त अवतरणिका ग्रंथ वाचन, पालखी मिरवणूक, महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. 
विवेक कोल्हे म्हणाले, श्रीक्षेत्र सराला बेटाचे मठाधिपती प. पू. ह.भ.प. रामगिरीजी महाराज हे ब्र. योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज व ब्र. सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज यांच्या कार्याची परंपरा आजही उत्तमप्रकारे अव्याहतपणे पुढे चालवत आहेत. कीर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून ते समाजप्रबोधनाचे फार मोठे सत्कार्य करत आहेत.सद्गुरू श्री गंगागिरी महाराज संस्थानशी माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे व कोल्हे परिवाराचे गेल्या अनेक वर्षांपासून निकटचे संबंध आहेत. ह.भ.प. रामगिरी महाराजांनी आपला आशीर्वाद सतत येसगावकरांच्या पाठीशी राहू द्यावा, 
याप्रसंगी  धनंजय जाधव यांची शिवसेना (एकनाथ शिंदे गट) प्रणित शेतकरी सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल येसगाव ग्रामस्थांतर्फे त्यांचा ह.भ.प. रामगिरीजी महाराजांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 
यावेळी ह.भ.प. अरुण महाराज रोहोम कारवाडीकर, आयोजक ओम श्री साई ग्रुप, श्री विठ्ठल भजनी मंडळ, श्री छत्रपती प्रतिष्ठान, श्री शंभू प्रतिष्ठान, श्री जाणता राजा प्रतिष्ठान, श्री रोकडोबा महाराज मित्रमंडळ, श्री सप्तशृंगी तरुण मंडळ, श्री शिवगर्जना तरुण मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, भजनी, टाळकरी मंडळी, येसगाव व पंचक्रोशीतील ग्रामस्थ तसेच भाविक-भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page