समता पॅटर्न म्हणजे सर्वांगीण विद्यार्थी घडविणे – रामराव ढिकले 

समता पॅटर्न म्हणजे सर्वांगीण विद्यार्थी घडविणे – रामराव ढिकले 

Samata Pattern is about creating a holistic student – Ram Rao Dhikle

गुणवंत विद्यार्थी, पालकांचा सन्मान Meritorious students, respect of parents

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu18 May23 ,19.30 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव : सद्याचे युग हे अत्यंत स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी समता इंटरनॅशनल स्कूलने विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.समता पॅटर्न म्हणजे सर्वांगीण विद्यार्थी घडविणे हे असल्याचे प्रतिपादन शहर पोलीस निरीक्षक रामदास रामराव ढिकले यांनी केले. 

 समता इंटरनॅशनल स्कूल आयोजित इयत्ता दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव व पालकांचा सन्मान सोहळा प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली. 
यावेळी व्यासपीठावर समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष काका कोयटे, माजी नगराध्यक्ष सुहासिनी कोयते, प्रेरणा पतसंस्थेचे चेअरमन  सुरेश वाबळे,कार्यकारी विश्वस्त सौ.स्वाती कोयटे आदी उपस्थित होते. 
पोनि. ढिकले पुढे म्हणाले की समता इंटरनॅशनल स्कूलच्या प्रगतीत शिक्षकांसोबतच कोयटे परिवाराचे योगदान ही खुप मोठे आहे. ते समता इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून सुजाण नागरिक घडवत आहेत. त्यांनी लावलेल्या शिस्तीचा अवलंब करून समता इंटरनॅशनल स्कूलचा झेंडा प्रत्येक क्षेत्रात उभारावा.असे आवाहन केले. 
कार्यकारी विश्वस्त सौ.स्वाती कोयटे म्हणाल्या की , आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुणवत्तापूर्ण शिक्षण देत एक परिपूर्ण विद्यार्थी म्हणून आम्ही तुम्हाला घडवले. आम्ही तुमच्या पंखामध्ये बळ देण्याचे काम केले, आता तुम्हाला उंच भरारी घ्यायची आहे.
पालक बाबासाहेब बेरगळ, विद्यार्थिनी तनिषा जैन, श्रुतिका देशमुख, गार्गी कदम, प्रीती परदेशी, ओम जाधव यांनी ही आपल्या भावना व्यक्त केल्या
स्वागत व परिचय उपप्राचार्य समीर अत्तार यांनी करून दिला.  प्रास्ताविक प्राचार्या सौ. हर्षलता शर्मा यांनी केले.
सुत्रसंचालन शिक्षिका सौ.शाद जलीस यांनी केले. आभार शिक्षिका सौ. सारीका अग्रवाल यांनी मानले

Leave a Reply

You cannot copy content of this page