कोपरगाव खेळाडूंसाठी क्रीडा संकुल उभारण्याचा प्रयत्न करू – आ. आशुतोष काळे

कोपरगाव खेळाडूंसाठी क्रीडा संकुल उभारण्याचा प्रयत्न करू – आ. आशुतोष काळे

We will try to build a sports complex for Kopargaon sportsmen. Ashutosh Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu18 May23 ,19.40 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव : मतदार संघातील उदयोन्मुख खेळाडूंना दर्जेदार क्रीडा साहित्य व खेळासाठी सर्व सुविधायुक्त क्रीडा संकुल उपलब्ध करून दिल्यास कोपरगावचे खेळाडू निश्चीतपणे आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकतील याचा मला विश्वास आहे. त्यामुळे या खेळाडूंसाठी कोपरगाव येथे अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी के बी पी विद्यालयाच्या मैदानावर आमदार चषक  ‘डे नाईट’ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या सामन्याच्या नाणेफेक प्रसंगी सांगितले.

आ. आशुतोष काळे पुढे म्हणाले की, कोपरगाव शहरात तीन दशकांनंतर डे नाईट क्रिकेट स्पर्धा होत आहे  आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू तो कोपरगावच्या खेळाडूंचा समावेश असावा अशी माझी इच्छा आहे यासाठी कोपरगाव मध्ये अद्यावत क्रीडा संकुल उभारण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे येथील केपीएल स्पर्धा आयपीएल स्पर्धेत प्रवेश करण्यासाठी उत्तम माध्यम ठरणार असल्याचा विश्वास आ. आशुतोष काळे यांनी व्यक्त करून आयोजकांनी स्पर्धेचे उत्तम नियोजन केल्याबद्दल आयोजकांचे कौतूक केले.

याप्रसंगी धरमचंद बागरेचाराजेंद्र कोयटे  संदीप वर्पे सुनील गंगूलेशहर पोलीस निरीक्षक रामराव ढिकलेग्रामीण पोलीस निरीक्षक वासुदेव देसले संतोष चवंडकेविरेन बोरावकेमंदार पहाडेसंदीप पगारेरमेश गवळीकृष्णा आढावराजेंद्र वाकचौरेदिनकर खरेअजीजशेख नवाज कुरेशीडॉ. तुषार गलांडेचंद्रशेखर म्हस्केबाळासाहेब रुईकरवाल्मिक लहिरेसंदीप कपिलेराजेंद्र खैरनार, इम्तियाज अत्तार, ऋषिकेश खैरनारआकाश डागारहेमान कुरेशीनिलेश डांगेरविंद्र सोनटक्केसचिन गवारेराजेंद्र बोरावकेराजेंद्र आभाळेकलविंदरसिंग डडीयालमनोज नरोडेसंतोष शेजवळरिंकेश खडांगळेमुकुंद इंगळेनितीन सोनवणेडॉ. अच्युत कडलगविशाल निकमनवनाथ घुसळेराकेश धाकतोडेराजेंद्र नळेपवन चिबडेस्वप्नील आढावसुमित लोहाडेतुषार बागरेचाआनंद काळेयोगेश अमृतकरकाका वर्माअण्णा जंजिरेनारायण नळेनंदू कुऱ्हाडेयोगेश वाणीसंदीप सावतडकरकुंदन भारंबेरुपेश वाकचौरेराहुल हंसवालनिलेश सपकाळनितीन सोनवणेहारूण शेख, शोएब शेखआतिक पठाणइम्रान पठाणहसनई शेखस्पर्धेचे आयोजक सोमनाथ आढावअनिरुद्ध काळेअमोल गिरमेसंकेत पारखे आदींसह सहभागी संघाचे खेळाडू व क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page