२० हजाराची लाच घेताना तहसीलदार   एसीबीच्या जाळ्यात; पंटरवर देखील कारवाई

२० हजाराची लाच घेताना तहसीलदार   एसीबीच्या जाळ्यात; पंटरवर देखील कारवाई

Tehsildar in ACB’s net while taking bribe of 20 thousand; Punter action too

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat20 May23 ,9.00 Am
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : तब्बल २० रुपयांची लाच घेणाऱ्या कोपरगावच्या तहसीलदाराला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. एसीबीने तहसीलदाराबरोबरच पंटरलापण ताब्यात घेतले.  कोणतीही केस न करता पकडलेला वाळूचा डंपर सोडण्या प्रकरणी ​ तहसीलदाराने लाच मागितली होती.

यातील तक्रारदार यांचे वाळू वाहतूकीचे गाडीवर कारवाई न करण्याकरिता ​ लाच घेणा-या कोपरगावच्या  तहसीलदारासह पंटरला शनिवारी नाशिक  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. या प्रकरणी रात्री उशिरा कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे
तक्रारदाराच्या कोणतीही केस न करता पकडलेला वाळूचा डंपर सोडून देण्यासाठी  कोपरगाव तहसिलदार विजय बोरूडे यांनी स्वत:साठी २० हजाराची  लाच मागितली. तसेच लाचेची रक्कम पंटरकडे देण्यास सांगितले. खाजगी इसम गुरमितसिंग दडियाल याला  २० हजाराची लाच
स्वीकारताना  पंच साक्षीदारा समक्ष रंगेहात पकडण्यात आले आहे. म्हणून आरोपी यांचे विरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
याबाबत  १७ मे रोजी तक्रारदाराने एसीबीकडे दिलेल्या तक्रारीनंतर लाचेबाबत एसीबीने पडताळणी केली.
लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एसीबीने शनिवारी (१९मे) रोजी कोपरगांव तहसिलदार कार्यालयात लावलेल्या सापळ्यात बोरूडे  आणि दडियाल अडकले.  २० हजारांची लाच घेताना बोरूडे आणि दडियाल यांना रंगेहात पकडण्यात आले.
सदर कारवाई श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर,पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक, नारायण न्याहाळदे अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र, नाशिक. नरेंद्र पवार वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस  अधीक्षक कार्यालय ,ला.प्र.वि. नाशिक.यांच्या मार्गदर्शनाखाली सक्षम  प्राधिकारी   अप्पर मुख्य सचिव,  मुंबई सापळा  अधिकारी,संदीप साळुंखे, (पोलीस निरीक्षक)लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक,सह सापळा  अधिकारी वैशाली पाटील (पोलीस उप अधीक्षक) लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक सापळा पथक-  पो. ह. पंकज पळशीकर ,पो.ना. नितीन कराड, पो.ना. प्रवीण महाजन, पो. ना प्रभाकर गवळी, चापोना/संतोष गांगुर्डे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक यांच्या पथकाने कारवाई केली आहे कोणत्याही अधिकाऱ्याने कसल्याही कामासाठी लाच मागितल्यास त्याची तक्रार नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे करावी असे आवाहन त्यांनी केले आहे                      

Leave a Reply

You cannot copy content of this page