लाचप्रकरणी अटक तहसीलदार विजय बोरूडे यांना जामीन मंजूर
Grant bail to Tehsildar Borude for buying bribes
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu23 May23 ,6.30. Pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : लाच प्रकरणी अटक करण्यात आलेल्या कोपरगाव तहसीलदार विजय बोरूडे यांना नेवासा येथील जिल्हा व सत्र न्या.जी. बी. जाधव यांनी अटी शर्तीसह ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला आहे.
खाजगी इसम गुरमीतसिंग दडियाल यांलाही जमीन मंजुर झाला आहे.
२० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी कोपरगाव तहसीलदार विजय बोरूडे यांना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी (ता. १९मे ) रोजी अटक केली. तहसीलदारांसहीत खासगी व्यक्ती गुरमितसिंग दडियाल , यांलाही अटक करण्यात आली. दोघांवर मध्यरात्रीनंतर कोपरगाव शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर रविवारी कोपरगाव येथील विशेष सत्र न्यायालयात आरोपींना हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
२१ मे रोजी पोलीस कोठडी संपली. कोपरगाव व श्रीरामपूर न्यायालय रजेवर असल्याने तहसीलदार विजय बोरुडे व त्यांचे हस्तक गुरमितसिंग दडियाल यांना नेवासा जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश जे एम पाटील यांनी निर्णय राखून ठेवत दोन्ही आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती . दरम्यान दोन्ही आरोपींनी जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे अशी माहिती तपासी अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नगर पोलीस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांनी आमचे प्रतिनिधी यांना दिली होती.
तहसीलदार यांचे वकील ॲड. जयंत जोशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, न्यायालयीन कोठडीत घेतल्यानंतर तहसीलदार यांच्या वतीने आम्ही जामीन अर्ज दाखल केला प्रथम दर्शनी फिर्यादी याचा वाळू वाहतूक व्यवसाय आहे त्याच्या अवैध वहातुकीविरुद्ध तहसीलदार यांनी कारवाई करू नये म्हणून तहसीलदार यांना गुंतविण्याचा प्रयत्न केला आहे. तहसीलदार यांनी कोणती रक्कम मागितली नाही किंवा स्वीकारली नाही किंवा कोणीही इसम प्राधिकृत केलेल्या नव्हता आणि तपास काम आता पूर्ण झालेले आहे आता कोठडीची गरज नसल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. त्यामुळे १४ दिवसांची कोठडी नाकारीत आरोपी यांना अटी शर्तीसह ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला आहे.व जामीनवर मुक्त करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती ॲड. जयंत जोशी यांनी दिली आहे. आरोपी गुरमीतसिंग दडियाल यांनाही जामीन मंजूर झाला आहे त्यांच्या वतीने ॲड. पी. व्ही. खिस्ते यांनी काम पाहिले.
Post Views:
286