कोपरगाव तब्बल १ कोटी ३४ हजाराचा गुटखा पकडला; कंटेनरसह, एकाच्या मुसक्या आवळल्या, ४ दिवसांची पोलिस कोठडी

कोपरगाव तब्बल १ कोटी ३४ हजाराचा गुटखा पकडला; कंटेनरसह, एकाच्या मुसक्या आवळल्या, ४ दिवसांची पोलिस कोठडी

Kopargaon caught Gutkha worth 1 Crore 34 thousand; With the container, one was arrested, police custody for 4 days

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun 3 June24 ,16.10. Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येसगाव शिवारात नगर मनमाड महामार्गावर इंदोर येथून येवला कोपरगाव मार्गे पुण्याकडे गुटख्याचे एक कंटेनर जात होता. हा कंटेनर येसगाव शिवारात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचला. कोपरगाव तालुका पोलिसांनी यावेळी कंटेनरसह सुगंधी तंबाखू आणि सुपारी असा एकूण एक कोटी ३४ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला. पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या समक्ष गुटख्याचा पंचनामा करण्यात आला.कंटेनरसह एकाच्या मुसक्या आवळल्या असून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी संदीप मिटके यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनला भेट देऊन आरोपीची माहिती घेतली

कोपरगाव तालुक्यातील नगर मनमाड महामार्गावर पोलिसांना खबऱ्या मार्फत या मार्गावरून गुटख्याचा कंटेनर जाणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार कोपरगाव तालुका पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, यांच्या पोलिस पथकाने सापळा रचला. क्रमांक एमपी ०९ जी.जी २९०० असा असलेला कंटेनर
इंदोर येथून येवला कोपरगाव मार्गे पुण्याकडे गुटख्याचे एक कंटेनर जात असताना सापळा रचलेल्या पथकातील सर्वांनी कंटेनर अडवले. पोलिसी खाक्या दाखवताच यामध्ये एका कंपनीचा गुटखा आहे तो पुण्याकडे वाहतूक करत असल्याचे संशयित आरोपींनी सांगितले.
कंटेनरची अडवून पाहणी करण्यात आली. तेव्हा वाहनांमध्ये बेसन सोयाबीन सह गुटखा असल्याचे लक्षात आले. यावेळी पोलिसांनी कंटेनरसह एकाला ताब्यात घेतले. कंटेनर चालक जमील अहमद इद्रीस (४५) राहणार रणसिका तालुका हातिन जिल्हा पलवल हरियाणा यांला ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे कसून चौकशी केली जात आहे. दरम्यान आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्या आरोपीला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे

ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी संदीप मिटके यांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, यांच्यासह पोलीस उप निरीक्षक महेश कुसारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश गागरे, पो. कॉ. अंबादास वाघ, पोकों, रशिद शेख, पो. कॉ. जयदीप गवारे, पोना, रामा साळुंके यांच्या पोलिस पथकाने कारवाई केली.

कोट
कोपरगाव तालुका पोलिसांच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाईही कारवाई राज्यातील एक मोठी कारवाई असून कोपरगाव तालुका पोलिसांच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी सांगितले. पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे कसून चौकशी केली जात आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page