महाराष्ट्राची लालपरी ७५ वर्षाची ; कोपरगाव आगारात जल्लोषात वर्धापन साजरा
Lalpari of Maharashtra is 75 years old; Anniversary celebration in Kopargaon Agar
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun 3 June24 ,16.20. Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव : महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून एसटीला ओळखले जाते. राज्याच्या कानाकोप-यात असलेल्या प्रत्येक गावात जाण्यासाठी लालपरी ही प्रत्येकाला हक्काची वाटते. १ जून १९४८ रोजी पुणे ते अहमदनगर या मार्गावर एसटी महामंडळाची सर्वात पहिली बस धावली होती. याच लालपरीला १ जून २३ रोजी ७५ वर्ष पूर्ण झाले आहे. या निमित्ताने रविवारी (३जुन) २०२३ रोजी एसटीचा वर्धापन दिन कोपरगांव आगार येथे साजरा करण्यात आला आहे.
कार्यक्रम अध्यक्षस्थानी ग्रामीण पोलीस निरीक्षक वासुदेव देसले होते. त्यांनी लाल परीचा रंजक इतिहास विशद केला. राज्य पतसंस्था फेडरेशनचे तसेच समता पतसंस्थेचे अध्यक्ष काका कोयटे यांनी याप्रसंगी लाल परीचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आगामी काळात तो सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात यावा असे सांगून चालक वाहकांनी प्रवाशांना उत्तम सेवा देऊन समन्वय ठेवावा, सर्वसामान्य माणूस लाल परी बस कडे आकर्षित व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न करावा, बसने प्रवास किती सुखकर आहे हे पटवून द्यावे असे आवर्जून सांगितले. सुधीर डागा यांनी बस स्थानक परिसरात १६ सीसीटीव्ही कॅमेरे लोकार्पण करण्यात आल्याचे सांगितले. सामाजिक कार्यकर्ते चांगदेव कातकडे यांनी बसस्थानकाला सिक्युरिटी तसेच स्वच्छतेसाठी चार जणांची नियुक्ती करण्याचे यावेळी जाहीर केले.
प्रवेश दारावर काढण्यात आलेली सडा रांगोळी.. झेंडूची फुले पान फुलांनी केलेली सजावट तसेच आंब्याचे तोरणे.. नारळाच्या झावळ्यानी उभारलेल्या स्वागत कमानी.. प्रवाशांच्या स्वागताला स्वच्छ केलेले बस स्थानक…. रंगीबेरंगी फुलांनी, फुग्यांनी केलेली आकर्षक सजावट…. समता पतसंस्थेच्या वतीने प्रवाशांना पिण्याचे स्वच्छ जागेवर दिले जाणारे पाणी… स्थानकात उभारलेला सेल्फी पॉईंट…. तसेच प्रवाशांच्या हस्ते केलेले बस गाडीचे पूजन…. प्रवाशांना कर्मचारी बांधवांना वर्धापन दिनानिमित्त वाटण्यात आलेले साखर पेढे…. असे चित्र आज येथील बस आगारात दिसून आले… निमित्त होते एस टी महामंडळाच्या ७५ व्या वर्धापन दिनाच.
प्रभारी आगार प्रमुख अमोल बनकर यांनी मनोगतात म्हटले की सामाजिक कार्यकर्ते काका कोयटे यांनी पुढाकार घेतल्याने व स्थानकाचा चेहरा मोहरा बदलण्यास मोठा हातभार मिळाला त्याबाबत त्यांचे मनापासून स्वागत केले, कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक संघाचे विजय बंब केशवराव भवर नरेंद्र कुर्लेकर यांच्यासह एसटी कर्मचारी अधिकारी वर्ग प्रवासी उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेंद्र जाधव यांनी केले तर आभार अविनाश गायकवाड यांनी मानले.
चौकट
आज बस स्थानकाचे नेहमीपेक्षा वेगळेच रुपडे पहावयास मिळाले, कोट्यावधी रुपये खर्च उभी केलेली इमारत व त्याचा परिसर आज फुलून दिसत होता. समता पतसंस्थेच्या पुढाकारानेह तयार केलेले वातावरण कायम राहावे यासाठी एसटी प्रशासनाने आता त्याची जबाबदारी उचलावी असे श्री कोयटे यांनी आवर्जून सांगितले.
Post Views:
289