नाराजीचा सूर: पदाधिकारी नेमणुकावरून (ऊबाठा) शिवसैनिकांत अस्वस्थता, मात्र बंडखोरी होईल एवढी नाही- माजी पदाधिकारी
Tone of displeasure: Disquiet among ( UBT) Shiv Sainiks over the appointment of office bearers, but not to the point of mutiny – former office bearer
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun 4 June24 ,16.20. Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव : कोपरगाव शहर व तालुका स्थानिक पदाधिकारी नेमणुकावरून कोपरगाव शहर व तालुका इच्छुक शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता आहे. पण, बंडखोरी होण्याइतकी नाही, असे माजी पदाधिकारी म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व शहरप्रमुख या दोन नवीन पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका झाल्या आहेत याला देखील चार महिने उलटून गेलेले आहेत परंतु अद्यापही शहर व तालुक्यातील नवीन स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका झालेल्या नाहीत . त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर असल्याची चर्चा आहे.
सध्या पदाधिकारी नसल्यामुळे ग्राउंड लेव्हलला काम करताना अडचण आहे. शहर आणि तालुका कार्यकारणी असेल तर त्या शहरातील व तालुक्यातील प्रश्न मार्गी लावायला सोपं जातं. पण पदाधिकारी नसल्याने लोकांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. हे मात्र खरं आहे,” असे ते म्हणाले.
शिवसेनेचे विभाजन झाल्यामुळे आधीच कार्यकर्त्यात मरगळ आली आहे त्यात चार महिन्यापूर्वी झालेल्या (ऊबाठा) शिवसेना नव्या पदाधिकारी नेमणुकामुळे जुनी कार्यकारणी बरखास्त झाल्याने पक्षाच्या कामकाजात आलेली शिथिलता आणि जिल्हाप्रमुख व शहरप्रमुख ही दोनच पदे असल्याने शहर व तालुक्यातील पक्षाच्या कामकाजावर परिणाम झाला असल्याचे दिसत आहे.
एकीकडे नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद विधानसभा लोकसभा या निवडणुका एकत्रित होण्याची चिन्ह असल्याने सर्वच पक्षांची तयारी जोरदार तयारी सुरू आहे त्यात (ऊबाठा) शिवसेनेच्या शिर्डी लोकसभेच्या जागेवर काँग्रेसने दावा केला आहे. कोणत्याही क्षणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याची शक्यता असल्याने भाजपासह सर्व पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत उमेदवारांची चाचपणी सुरू आहे.परंतु शिवसेनेच्या गोटात मात्र सामसूम आहे पदाधिकारी नेमले नसल्यामुळे इच्छुक शिवसैनिकात अस्वस्थता आहे त्यामुळे बूथप्रमुख वार्डप्रमुख यांच्या नेमणुका व नियोजन कधी करणार हा ही प्रश्न आहेच,
शिर्डी लोकसभेचा (ऊबाठा) शिवसेनेच्या उमेदवार कोण ? याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे हे शिंदे गटात गेल्यामुळे लोकसभेचा शिवसेनेचा उमेदवार कोण याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे अशा परिस्थितीत उमेदवाराची ओळख होऊन कामाला लागण्याची गरज आहे परंतु पदाधिकाऱ्यांची नेमणूक नसल्यामुळे काम करण्यात अडचणी येत आहेत. पक्षाच्या कामाला खीळ बसली आहे. महत्त्वाचे निर्णय अडले आहेत. वेळ कमी आहे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संपर्क नेते, जिल्हाप्रमुख पदाधिकारी यांनी बैठकांचा सपाटा लावला पाहिजे.पण तसे काही दिसत नाही तेंव्हा तातडीने कोपरगाव शहर व तालुक्यातील नव्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका न झाल्यास पक्षाला ते अडचणीचे ठरू शकते
चौकट
कोपरगाव शहर व तालुक्यात खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे शिवसेना यांनी शहर व तालुका कार्यकारणी जाहीर करून पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आहेत व कोपरगाव शहर व तालुक्यात पक्षाची बांधणी करण्यात आघाडी घेतली आहे
Post Views:
227