एसटी महामंडळ आणि समता पतसंस्थात विश्वास आणि सुरक्षितता ‘या’ २ गोष्टींमध्ये साम्य- संदीप मिटके
Trust and Security are 2 things in common between ST Corporation and Samata Credit Institution – Sandeep Mitke
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon 5 June24 ,11.20. AmBy राजेंद्र सालकर
कोपरगाव : एसटी परिवहन महामंडळ आणि समता सहकारी पतसंस्था यांच्यात विश्वास आणि सुरक्षितता हे दोन मुद्दे असे मुद्दे आहेत ज्यांमध्ये एकदम साम्य असल्याचे गौरवोद्गार शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी एसटीच्या ७५ व्या वर्धापन दिनी लोकार्पण कार्यक्रमात व्यक्त केले . अध्यक्षस्थानी किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार बंब होते

रविवारी (४मे) रोजी समता चॅरिटेबल ट्रस्ट, तालुका व्यापारी महासंघ, किराणा मर्चंट असोसिएशन यांच्या स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत सी.सी.टी.व्ही. सुरक्षा योजना , माणुसकीचे मंदिर ,जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र ,स्टोन गार्डन ,बस स्थानक सुशोभीकरण, एस. टी. कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी , रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते एसटी सेवेतील 42 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला
यावेळी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके पोलीस निरीक्षक वासुदेव देसले सहाय्यक पोलीस निरीक्षक ठोंबरे जेष्ठ महिला समितीच्या अध्यक्षा सौ.सुधाभाभी ठोळे, सौ.रजनी गुजराथी आगार प्रमुख अमोल बनकर, आगार वाहतूक नियंत्रण अधिकारी अविनाश गायकवाड,माजी नगराध्यक्षा सौ.सुहासिनी कोयटे ,जेष्ठ नागरिक सेवा मंचचे अध्यक्ष विजय बंब,शिवसेना (ठाकरे) उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, माजी शिवसेना शहर प्रमुख भरत मोरे, गगन हाडा, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सुनिल गंगुले, माजी नगरसेवक मंदार पहाडे, कांतीलाल जोशी , चांगदेव शिरोडे, अरविंद पटेल, अजित लोहाडे, तुलसीदास खुबानी, नारायण अग्रवाल, गुलशन होडे, केशव भवर, किरण बिडवे, संदीप कोयटे, दिपक अग्रवाल, सचिन भट्टड, प्रदीप साखरे, भाऊसाहेब पोटभरे, विष्णुपंत गायकवाड, हर्षल जोशी आदिंसह एसटी कर्मचारी व नागरिक हजर होते
प्रास्ताविकांत काका कोयटे म्हणाले,
एसटी ही महाराष्ट्राची जीवन रेखा आहे. सामान्य जनतेच्या जीवनात तिला अढळ स्थान आहे.तिला ७५ वर्षे पूर्ण होत असून अमृत महोत्सवी वर्षात ती पदार्पण करत आहे. बस स्थानकात स्वच्छता मोहिमेबरोबरच विविध सुविधा आणि उपक्रमांचे लोकार्पण झाले आहे. अशाच प्रकारच्या आगारातील सुशोभीकरणासाठी कोपरगावातील इतर सामाजिक संघटनांनी सहभाग घ्यावा.असे आवाहन केले. यामुळे कोपरगाव बस आगार जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात पहिला असेल असेही ते म्हणाले
यावेळी विवेक कोल्हे म्हणाले
काका कोयटे यांच्या पुढाकारातून या सर्व उपक्रमांचे लोकार्पण हे सामाजिक कार्यात आम्हा तरुणांना दिशा देणारे आहे स्व.शंकरराव कोल्हे परिवहन मंत्री असताना त्यांनी बसमध्ये महिलांना बसण्यासाठी राखीव जागांची तरतूद केली होती. चालक व वाहकांसाठी निवासी व्यवस्था करून देऊ.असे जाहीर केले.
राजकुमार बंब म्हणाले की , लाल परी ही पहिल्यांदा अहमदनगर – पुणे या मार्गावर धावली. त्या वेळेस तिचे नाव निल कमल असे होते. बसच्या चालक, वाहकांनी प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देऊन लाल परी ची ओळख सुवर्ण परी या नावाने करावी.असा आशावाद व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार सुधीर डागा यांनी मानले.
Post Views:
460





