सर्वे नंबर बाराशे बारा दोन दिवसात मोकळा – प्रशांत सरोदे
३२ अतिक्रमणे हटविली, २३ लाखाचे पार्किंग होणार
वृत्तवेध ऑनलाइन । 27 July 2020
By : Rajendra Salkar, 19.53
कोपरगाव : शहरातील मुख्य रस्त्यावरील संत ज्ञानेश्वर महाराज व्यापारी संकुल पाठीमागील बाजूस ते थेट पंचशील मोबाईल सेंटर पर्यंत सिटी सर्वे क्रमांक १२१२ मध्ये ३२ जणांचे अतिक्रमणे दोन दिवसात काढून टाकण्यात आली असून त्या जागेवर आता तेवीस लाख रुपये खर्चाचे रस्ता कॉंक्रिटीकरण गटार ड्रेनेज पार्किंग चे काम केले जाणार असल्याची माहिती अधिकारी प्रशांत सरोदे यांनी दिली.
प्रशांत सरोदे म्हणाले, नगरपालिकेच्या वतीने मुख्य रस्त्याचे रुंदीकरण सुशोभिकरण करण्याचे काम नियोजित आहे त्यानुसार संत ज्ञानेश्वर महाराज व्यापारी संकुला पाठीमागील बाजूस ते थेट इंदिरा गांधी शॉपिंग सेंटर समोरील पंचशील मोबाईल सेंटर पर्यंत असलेली २४ व इतर ८ असे बत्तीस जणांची अतिक्रमणे झाली होती त्या सर्वांना नोटिसा देण्यात येऊन हे अतिक्रमण गेल्या दोन दिवसापासून काढून टाकण्यात आले काहींनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेतली बुलडोजर असलेली माती लोटण्याचे काम सुरू असून तेथे अंडरग्राउंड सिमेंट व गटारी टाकण्याचे नियोजन आहे तसेच रस्ता कॉंक्रिटीकरण पार्किंग आधी सुविधा केल्या जाणार आहेत सदर जागेवर अजून तरी कोणतेही शॉपिंग सेंटर अथवा गाळे काढण्याचे नियोजन नसल्याचे नगर अभियंता दिगंबर वाघ यांनी सांगितले. या जागेवर ती पुन्हा अतिक्रमणे होणार नाही, याची खबरदारी नगरपालिका आता घेणार असल्याचे त्यांनी सांगितले शहरातील अतिक्रमणे टप्प्याटप्प्याने काढण्याचे नियोजन आहे. याचप्रकारे पालिकेने शहरातील विविध ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.