कु.मोनालीच्या अकाली निधनाने शिक्षणाचे स्वप्न अपुरे…
वृत्तवेध ऑनलाइन 27 July 2020
By: Rajendra Salkar ,20.51
कोपरगाव : शांत संयमी व हुशार मुलांच्या यादीत नाव असलेली कु मोनाली गणपत होन हिने बारावीला विज्ञान शाखेत ७२ टक्के गुण मिळविले पुढील शिक्षणाचे स्वप्न रंगवत असतानाच अचानक आलेल्या तापामुळे मोनालीचा मृत्यू झाला. तिचे पुढील शिक्षणाचे स्वप्न अपुरे राहिले .
चांदेकसारे येथील होन परिवारातील मोनाली ही श्री ग. र. औताडे पाटील विद्यालयात शिक्षण घेत होती. नुकताच बारावीचा निकाल लागला होता. चांगले मार्क मिळाले याचा आनंद ती साजराच करत होती. परंतु पाच सहा दिवसा पूर्वी तिला अचानक ताप आला.म्हणून चांदेकसारे व पोहेगाव येथील खासगी रुग्णालयात तिला हलविण्यात आले.उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याने व सध्या कोरोनाव्हायरसचे संकट असल्याने वडील गणपत होन, आजोबा भिमाजी होन, रोहिदास होन, ज्ञानदेव होन, कुशाराम होन यांनी तिला शिर्डी साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल केले.त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिची संपूर्ण टेस्ट केली. कोरोना टेस्ट करण्यात आली त्यावेळी तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याचेही तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.परंतु ताप कमी अधिक होत असतानी डॉक्टरानी तिची रक्त तपासणी केली असता, तिच्या शरीरातील प्लेट्सलेट्स कमी झाल्यामुळे तसेच रक्त गोठण्याची क्रिया कमी होत असल्यामुळे तिचा मृत्यू झाला असल्याचे प्रथमदर्शी अहवालात स्पष्ट झाले.
मोनालीला पुढील शिक्षणात करिअर करण्याची इच्छा होती मात्र अकाली निधनाने ही इच्छा मावळळी.चांदेकसारे परिसरात तिच्या अचानक झालेल्या निधनामुळे शोककळा पसरली आहे. माजी सभापती अनुसयाताई होन,श्री ग. र. औताडे पाटील विद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापकांनी तिच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.





