आषाढी वारी २०२३: विठुरायाच्या दर्शनासाठी विशेष बससेवा

आषाढी वारी २०२३: विठुरायाच्या दर्शनासाठी विशेष बससेवा

Ashadhi Vari 2023: Special Bus Service for Vithuraya Darshan

कोपरगाव आगारातून  ३० जादा बसेस 30 additional buses from Kopargaon Agar

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir23 June24,15.10Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : कोपरगाव शहर व तालुक्यातील आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांची संख्या लक्षणीय आहे. ही संख्या लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाच्या निर्देशानुसार कोपरगाव आगार व्यवस्थापनाने आषाढी पंढरपूर यात्रा २०२३ अंतर्गत लालपरी, शिवशाही, हिरकणीसह एकूण ३० विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. या बसगाड्यांतून ७५ वर्षे वयापेक्षा अधिक नागरिक मोफत प्रवास करू शकणार आहेत. तर ज्येष्ठ नागरिकांसह महिला निम्म्या तिकिटाने प्रवास करता येणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, येत्या येत्या २९ जूनला आषाढी एकादशी आहे. या उत्सवासाठी कोपरगाव तालुक्यातील हजारो भक्तांनी पंढरीच्या वारीची तयारी केली असून, त्यांना यात्रा विशेष गाड्यांचा आधार असणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांना एसटीत सरसकट ५० टक्के सवलतीची घोषणा राज्य शासनाने केली होती. त्याची अंमलबजावणी सुरु असून, पंढरपूर यात्रेतही महिलांना या सवलतीचा लाभ घेता येणार आहेत. तसेच ७५ पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना आषाढी वारीतही एसटी महामंडळ मोफत प्रवास घडविणार आहे.
२५ जूनपासून एसटीच्या विशेष सेवा पंढरपूरच्या यात्रेसाठी २५ जून ते ४ जुलै या कालावधीत आषाढी पंढरपूर यात्रा विशेष योजनेंतर्गत अतिरिक्त बसगाड्या आगारातून सोडल्या जाणार आहेत. यात्रेचा मुख्य दिवस २९ जून असल्याने भक्तांना त्यापूर्वीच तेथे पोहोचता येणार आहे.आषाढी वारीसाठी भाविकांची गर्दी वाढणार असल्याचे एसटी महामंडळाने ग्राह्य धरले आहे. महिला सन्मान योजना आणि ज्येष्ठ सन्मान योजना असल्यामुळे प्रतिसाद वाढणार आहे.
प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेता आगारातून जादा बसेस सोडल्या जाणार आहेत. भाविकांनी या बससेवेचा लाभ घ्यावा,यावेळी बस आगारात मोठ्या प्रमाणावर प्रवाशांना सोडवण्यासाठी चार चाकी दुचाकी गाड्या येतात, त्या गाड्या आगारात न लावता बाहेर लावण्यात याव्यात असे आवाहन स्थानक प्रमुख अविनाश गायकवाड यांनी केले आहे.

 कोट

पंढरपूर यात्रेसाठी कोपरगांव आगारातून एकूण ३० बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. या यात्रेतही ७५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत, तर ६५ वर्षे वयाचे ज्येष्ठ नागरिक आणि महिला भक्तांना ५० टक्के सवलत असणार आहे. खाजगी अवैध वाहनांनी प्रवास करू नये – अमोल बनकर , प्रभारी आगारप्रमुख, कोपरगाव .

Leave a Reply

You cannot copy content of this page