आषाढी एकादशीला कुर्बानी देणार नाही; बकरी ईदवरून मुस्लिम बांधवांचा एकतेचा आदर्श निर्णय
Ashadhi will not sacrifice on Ekadashi; An ideal decision of unity of Muslim brothers on Bakri Eid
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onSat24 June24,15.10Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : आषाढी एकादशीला यावेळी बकरी ईद आहे. यामुळे सर्व परिस्थिती लक्षात घेता कोपरगावमधील मुस्लिम बांधवांनी आषाढीच्या दिवशी कुर्बानी देणार नाही, असा आदर्श निर्णय घेऊन एकतेचा संदेश दिला आहे.
यंदाची आषाढी एकादशी वेगळी ठरणार आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी बकरी ईद आल्याने हे दोन्ही सण एकाच दिवशी साजरे होणार आहेत.
या पार्श्वभूमीवर सामाजिक सलोखा राखण्यासाठी आणि मधला मार्ग काढण्यासाठी शहर पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (२३जुन) सायंकाळी शहर पोलीसस्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक झाली.या शांतता समितीच्या बैठकीत सामाजिक सलोखा राखण्यासाठी कोपरगावातील मुस्लिम समाजाने आषाढी एकादशीच्या दिवशी कुर्बानी देणार नाही असा निर्णय शांतता समितीच्या बैठकीत घेऊन भाईचाराचे आदर्श उदाहरण घालून दिले. यासाठी शहर पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी पुढाकार घेतला.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये किरकोळ कारणावरून दंगली घडत असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण झालं होतं. या पार्श्वभूमीवर कोपरगावमधील मुस्लिम बांधवांनी एकतेचा संदेश देणारा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे हिंदु बांधवांनी तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे.
शांतता समितीच्या बैठकीस पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, पोसई रोहिदास ठोंबरे, पोसई संजय पवार,पोकॉं.गणेश काकडे, पोकाँ एस.बी. कु-हाडे, पोकाँ बाळू धोंगडे, पोहेकॉ दिलीप तिकोणे, संभाजी शिंदे, महेश फड, पोहेकॉ जालिंधर तमनर, आदिसह पोलीस कर्मचारी हजर होते.
यावेळी ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख असलम शेख, रियाजसर, अल्ताफ कुरेशी, ठाकरे शिवसेना तालुका समन्वयक मुन्ना मन्सुरी, माजी नगरसेवक मेहमूद सय्यद, फकीर मामू कुरेशी, राष्ट्रवादी युवकशहराध्यक्ष नवाज कुरेशी, निसार मौलाना, सलीम चमडेवाले, हाशमभाई पटेल, फिरोज पठाण यासह शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.