कोपरगावात मांस, ११ जनावरे पकडली; दोघांना ताब्यात घेतले

कोपरगावात मांस, ११ जनावरे पकडली; दोघांना ताब्यात घेतले

Meat, 11 animals caught in Kopargaon; Both were detained

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onTue27 June24,21.20Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : जनावरांची कत्तल करून साठविलेले मांस व ४ गायी व ७ गोऱ्हे
अशी अकरा लहान-मोठी जिवंत जनावरे जप्त करण्यात आल्याप्रकरणी समध फकिरमहम्मद कुरेशी (४५) रा.सुभाषनगर,कोपरगाव, मुन्तजीर रौफ कुरेशी (२५) रा. सुभाषनगर, कोपरगाव या दोघांना ताब्यात घेतले
याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पो .काँ. ज्ञानेश्वर मधुकर भांगरे यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, मंगळवारी (२७जुन) रोजी दुपारी साडेबारा वाजता समध फकिरमहम्मद कुरेशी याचे घराचे समोर अडोश्याला सुभाषनगर, कोपरगाव येथून जनावरांची कत्तल केलेले मांस; तसेच अकरा लहान-मोठी जिवंत जनावरे (एकूण किंमतः ५७ हजार रुपये) जप्त करण्यात आली होती. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात कत्तल करण्याचे उद्देशान गोवंश जनावरांना यातना होतील अशा पद्धतीने निर्दयीपणे बांधुन ठेवुन तसेच गोवंश जनावरांचे मांस जवळ बाळगताना मिळुन आले
प्रकरणी गुन्हा दाखल होऊन
समध फकिरमहम्मद कुरेशी व मुन्तजीर रौफ कुरेशी (दोघे रा. कोपरगाव ) या आरोपींना अटक करण्यात आली.
घटनास्थळाचा पो.स.ई, रोहीदास ठोंबरे, पोस.ई. भरत दाते यांनी भेट दिली असून प्रभारी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे.कॉ डी. आर. तिकोणे हे पुढील तपास करीत आहेत

Leave a Reply

You cannot copy content of this page