संजीवनीच्या२० अभियंत्यांची डेलॉईटमध्ये ५ लाख वार्षिक पपॅकेवर निवड- अमित कोल्हे
20 engineers from Sanjeevi selected in Deloitte on 5 lakh annual package – Amit Kolhe संजीवनीमुळे गामिण युवक-युवती बनताहेत नोकरदारDue to Sanjeevani, village youths become employees
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onWed28 June24,15.20Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगांव: संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंटच्या विभागाच्या विशेष कृती कार्यक्रमातुन जगात १५० देशात कार्यरत असलेल्या डेलॉईट या जगविख्यात कंपनीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हद्वारे संजीवनीच्या तब्बल २० नवोदित अभियंत्यांची वार्षिक पॅकेज रू ५ लाखांवर निवड केली आहे.ग्रामिण युवक-युवती वयाच्या २२ व्या वर्षी नोकरदार बनुन कुटूंबाचा आधार बनत आहे, सध्या हे सर्व विध्यार्थी भुवनेश्वर येथे ट्रेनिंग घेत आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
निवड झालेल्या विध्यार्थ्यांमध्ये कोमल आबासाहेब गवारे, योगिता कैलास भोई, बाळप्रसाद राजाराम नवघरे, वैष्णवी मनोज भुजबळ, मंजुश्री दत्तु गावित्रे, तेजस पाराजी हर्दे, ईश्वर दिपक पाटोळे, भक्ती प्रशांत पेंशनवर ,विराज प्रल्हाद रिंधे, प्रियंका सुभाष सोनवणे, संजना सतिश आमले, प्रणाली दिलीप ढमाले, सार्थक अर्जुन मुर्तडक, झहिर रियाझ पठाण, विशाल प्रदिप शेलार प्रद्युम्ना अजित तनपुरे, गौरव देवेंद्र वानखेडकर, अंजली कैलास माळी, कुणाल शशिकांत बोरनार व सायली संजय वाबळे यांचा समावेश आहे. श्री कोल्हे पुढे म्हणाले की सृजनशिलता व संशोधन वृत्तीचे संवर्धन हे ज्ञान संपादनाचे मुळ उद्धिष्ट संजीवनीने जोपासले आहे. आधुनिक ज्ञानकोशाचा वापर शिक्षकांकडून अवलंबविल्या जात असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा निर्माण केल्या जाते. संजीवनीच्या शिक्षण पध्दतीनुसार जिज्ञासेचे ज्ञानात रूपांतर होते. केवळ पुस्तकी शिक्षण दिल्याने विद्यार्थी परीक्षार्थी होवुन चांगले गुण मिळवु शकतात परंतु चांगला गुण मिळविणारा विद्यार्थी चांगला ज्ञानार्थी होईलच याची खात्री नसते. म्हणुन विद्यार्थी गुणार्थी तर असावाच पण जगातील महाकाय स्पर्धेत खंबिरपणे सक्षम करण्यासाठी त्याला सर्व अंगाने ज्ञानार्थी बनविणे गरजेचे आहे. या सर्व बाबींचा संजीवनी मध्ये अवलंब केल्या जात असल्यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळुन ते स्वावलंबी होत आहे, असे श्री. कोल्हे शेवटी म्हणाले. संस्थेचे अध्यक्ष नितिन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी सर्व नोकरदार बनलेले नवोदित अभियंते व त्यांचे भाग्यवान पालक, डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकुर, सर्व विभाग प्रमुख व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे डीन यांचे अभिनदंन केले.