इंडियन नेव्ही कर्मचाऱ्यांची मुलगी झाली पोलीस उपनिरीक्षक
Daughter of Indian Navy personnel became Police Sub-Inspector
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onSat8 June24,15.30Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : मुलीची शिक्षणाची जिद्द व चिकाटी लहान पणापासूनच होती, त्यामुळे तिच्या शिक्षणाला घरच्या अडचणी बाजूला ठेवून प्राधान्य दिले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन अश्विनी सुरेश शिर्के हिची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्यानंतर आला. तिला दिलेल्या प्रोत्साहनाचे व कष्टाचे चीज झाले असल्याचे अश्विनी हिचे वडील सुरेश शिर्के यांनी सांगीतले.
अश्विनी ही घाटकोपर येथील इंडियन नेव्ही मध्ये सर्विस ला असलेल्या सुरेश शिर्के यांची मुलगी. शिकण्याची जिद्द व धाडसी वृत्ती बघून तिच्या शिक्षणाची सोय केली, तिने ही परिस्थितीची जाणीव ठेवून यश संपादन केल्याने आमचा आत्मविश्वास वाढल्याचे शिर्के यांनी सांगितले.
अश्विनी हिचे माध्यमिक शिक्षण नासिक रोड येथील पुरुषोत्तम स्कूलमध्ये झाले तर बिटको महाविद्यालयातून तिने कला क्षेत्रातील एम ए (हिस्टरी) ही पदवी संपादन केली. पुणे येथील अकॅडमी मध्ये सतिष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०१८ पासून तिने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास सुरू केला होता अखेर सन २०२० मध्ये प्रिलिम्स कंबाईन, मुलाखती नंतर तिने पीएसआय साठी पात्रता मिळविली
माझ्या या प्रवासात माझी आई सुनिता शिर्के तिने माझ्यावर विश्वास टाकून मला खूप मदत केली व प्रोत्साहन दिले.आई-वडील, भाऊ,आजी व मामा तसेच इतर नातेवाईक व शिक्षकांची प्रेरणा मिळाल्यानेच मी हे यश संपादन करू शकल्याचे अश्विनी हिने सांगितले. तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.





