मंसूरी पिंजारी समाजाच्या तरुणांनो युपीएससी परीक्षा द्या; बना क्लासवन अधिकारी – आरिफ अली मंसूरी
Mansuri Pinjari Community Youth Take UPSC Exam; Bana Class One Officer – Arif Ali Mansoori
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onMon10July24,15.30Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : बिहारमधील अहमद मंसूरी याने अत्यंत गरिबीतून आयएएस परीक्षा पास झाल्याचे सांगत हे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून नगर जिल्ह्यातील मंसूरी पिंजारी समाजाच्या तरुणांनी भविष्यकाळात शिक्षणात गरुडझेप घेत युपीएससी परीक्षेमधून क्लासवन अधिकारी बनावे असे आवाहन मंसूरी पिंजारी समाजाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आरिफ अली मंसूरी यांनी कोपरगाव येथे केले. नगर जिल्ह्यात २२ हजाराहून अधिक मन्सुरी पिंजारी समाज आहे. तेंव्हा यासाठी जी आर्थिक शारीरिक मदत लागेल ती आम्ही देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली . अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी शबाना शेख या होत्या.
रविवारी (९ जुलै) रोजी कोपरगाव हॉटेल विरा पॅलेस येथे मंसूरी पिंजारी जमात विद्यार्थी गुणगौरव समारंभात बोलत होते.

अध्यक्षपदावरून बोलताना गटशिक्षणाधिकारी शबाना शेख म्हणाल्या, शिक्षणासाठी मुलींनी पुढे यायला पाहिजे लग्नानंतर मी माझे शिक्षण सुरू ठेवले मुलं लहान असतानाही मी माझे शिक्षण पूर्ण केले
मोठे अधिकारी झाले, शिक्षण घेतांना काही दिवसच कष्ट व त्रास सहन करावा लागतो परंतु त्यानंतर शिक्षणामुळे मान सन्मान मिळतो मी आज अनुभवत आहे. शिकताना ध्येय डोळ्यासमोर ठेवून जिद्द व चिकाटीने अभ्यास केल्यास मोठे स्वप्न देखील साकार होऊ शकते असेही त्यांनी सांगितले.
अभियंता साहिल मंसूरी, अभियंता असलम मंसूरी, बशीर मंसूरी सर (राहुरी) यांनी विद्यार्थ्यांना कॅरिअर मार्गदर्शन केले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आरिफ अली मंसूरी, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष हाजी कलीम मन्सुरी, नगरसेवक नईम मन्सुरी (गंगापूर), नगरसेवक सिकंदर नदाफ ( मुंबई) नगरसेवक आरिफ मन्सुरी ( सटाणा), मतीन मन्सुरी चेअरमन (फैज अर्बन बँक नाशिक)
अहमदनगर औरंगाबाद व नाशिक येथील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने मंसुरी पिंजारी समाजाचे प्रदेशाध्यक्ष आरिफ अली मंसूरी यांनी कोपरगाव शिवसेना कार्यालयाला भेट दिली यावेळी त्यांचा सत्कार जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, उपजिल्हाप्रमुख असलम शेख, माजी शहरप्रमुख भरत मोरे व आदी पदाधिकारी यांनी केला.
गुणगौरव सोहळ्यासाठी मंसूरी पिंजारी समाज प्रदेश महासचिव मुन्ना मन्सुरी, तालुकाध्यक्ष आयुब मन्सुरी, उपाध्यक्ष करीम मंसूरी, सेक्रेटरी फयाज मन्सुरी, खजिनदार नदीम मंसूरी,बंटी मंसुरी, समीर मंसूरी,फकीर मोहम्मद मंसूरी राजू मन्सुरी, सलीम मंसूरी, आधीच पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन व आभार जमील मंसूरी सर यांनी मानले
चौकट
कोपरगाव येथील मन्सुरी पिंजारी जमात विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पाहून सर्व पदाधिकाऱ्यांनी यापुढे दरवर्षी जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा हा कोपरगाव येथेच करण्यात येईल – हाजी कलीम मन्सुरी (उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष)
Post Views:
550





