लोकप्रतिनिधीला सवड नाही ; जनतेसाठी मलाच समस्या निवारण बैठक घ्यावी लागते – विवेक कोल्हे
People’s representatives have no choice; I have to hold a problem solving meeting for the public – Vivek Kolhe
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onTue11 June24,19.00Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : लोकप्रतिनिधी यांनी दरबार, समन्वय समितीची नियमित बैठक घेऊन जनतेचे प्रश्न सोडविणे अपेक्षित आहे; पण दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. लोकप्रतिनिधीला सवड नसल्याने लोकांच्या आग्रहास्तव जनतेचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी दर महिन्याला तहसील कार्यालयात मलाच समस्या निवारण बैठक घ्यावी लागत असल्याची गौप्यस्फोट सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी सोमवारी (१०जुलै) रोजी तहसील कचेरी येथील समस्या निवारण बैठकीत केला. कांदा अनुदान व पिक विमा यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) चालकाकडून होणारी शेतकऱ्याचे लूट तातडीने थांबवा असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
प्रारंभी विवेक कोल्हे यांनी नूतन तहसीलदार संदीप भोसले यांचा सत्कार केला.
विवेक कोल्हे म्हणाले की, शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या कांदा अनुदानासाठी अपात्र झालेल्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजूर करून त्यांना तातडीने अनुदान द्यावे. राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी केवळ १ रुपयात पीक विमा योजनेचे अर्ज भरण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) चालक शेतकऱ्यांची होणारे लूट थांबवा तसेच कांदा अनुदान व पीक विम्यासाठी शेतकऱ्यांना अजिबात वेठीस धरू नये, अशी आग्रही मागणी तहसीलदारांकडे केली.
समस्या निवारण बैठकीत विवेक कोल्हे यांनी पाणी, रस्ते, वीज, स्मशानभूमी, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान, घरकुल, रेशनकार्ड ऑनलाईन करणे, समृध्दी महामार्गाच्या कामामुळे खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती, पाण्याचा निचरा, संजय गांधी निराधार योजनेचे प्रलंबित प्रस्ताव मंजूर करणे आदी अनेक महत्त्वाचे प्रश्न मांडले.
माजी आमदार स्नेहलता कोल्हे व मी जनहिताचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करत असून, आजवर विकासाचे अनेक प्रश्न आम्ही मार्गी लावले आहेत. आजच्या बैठकीत मांडलेले प्रश्न त्वरित सुटले नाहीत तर आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
चौकट
लोकप्रतिनिधी यांचा प्रशासकीय अधिकाऱ्यांवर अजिबात वचक राहीला नाही.त्यामुळे शासकीय अधिकारी, कर्मचारी मनमानी करीत आहेत त्यामुळे जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत कांदा अनुदान व पिक विमा यासाठी लोकांना वेठीस धरले जात आहे. -विवेक कोल्हे अध्यक्ष कोल्हे कारखाना
तहसीलदार संदीप भोसले यांनी या प्रलंबित प्रश्नांवर लवकरात लवकर योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
या बैठकीस गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, तालुका भूमी अभिलेख विभागाचे भास्कर, महावितरणचे अभियंता किशोर घुमरे, कोपरगाव बाजार समितीचे सभापती तथा भाजप तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात, बापूसाहेब बारहाते, सुनील देवकर, मारूतीराव लोंढे, सरपंच डॉ. विजय काळे, दीपक चौधरी, सरपंच सतीश बोरावके, डॉ. नानासाहेब होन, कैलासराव रहाणे,बाबासाहेब नेहे,कानिफ गुंजाळ,आनंद शिंदे,किसनराव पवार, राजेंद्र बढे, कचेश्वर माळी, अमोल गवळी, अनिल गवळी, सतीश केकाण, रामदास शिंदे, प्रभाकर शिंदे, अविनाश संवत्सरकर, प्रशांत आढाव, कैलास चांडे, प्रसाद आढाव, अमोल गवळी, अनिल गवळी, राजेंद्र बडे, अशोकराव गवारे, विजु जामदार, मुकुंद काळे, राजेद्र जामदार, विलास निकम, गोरख टुपके, ज्ञानेश्वर निकम, सरपंच जयराम वारकर, सोपानराव देठे, मारुती देठे, रामराव देठे, कचरु भाटे, मनोज थोरात, दत्तात्रय टुपके, अनिल भाकरे, सोपान भाकरे, पप्पू भाकरे, आबासाहेब भाकरे, उक्कडगावचे दादासाहेब निकम, दत्तात्रय निकम, सुरेश जाधव, कैलास माळी, राजकुमार दवंगे, शरदराव गडाख, गोरक्षनाथ गाडे, दादा कासार, नवनाथ सोनवणे, गोरख नाजगड, सतीश बोरावके, रावसाहेब मोकळ, किरण उगले, मोहन जाधव, दादासाहेब सुंबे, दत्तात्रय घेगडमल, रामजी आसने, पोपट आसने, रवींद्र रांधवणे, सुभाष कानडे, भाऊसाहेब शिरसाट, मनोज तुपे, सुरेश शिंदे, शिवाजी देवकर, बाबासाहेब गायकवाड, विजय गीते, कपिल सुरळकर, अतुल सुरळकर, किशोर साळुंखे, भाऊसाहेब वाकचौरे, लक्ष्मण वाकचौरे, रवींद्र सोळसे, रंगनाथ भागवत, भाऊसाहेब सिरसाठ, सुरज मुसळे, गोरक्षनाथ टुपके आदींसह विविध विभागांचे अधिकारी, माजी जि. प. व पं. स. सदस्य, सरपंच, सोसायटीचे चेअरमन. विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views:
91