सावधान : कोपरगावात सोमवारी ७ नवे पॉझिटिव्ह ; २६ जणांवर उपचार सुरू
शहर १९ ऍक्टिव्ह, ग्रामीण ७ ऍक्टिव्ह ,
कोपरगाव कोरोना अपडेट : २६ जुलै २०२०
५६० तपासण्या, ५९ जण कोरोना ग्रस्त, ३२ जण कोरोनामुक्त, तर एका महिलेचा मृत्यू, २६ जण ऍक्टिव्ह, ४६२ अहवाल निगेटिव्ह- डॉ. फुलसौंदर
कोरोना रुग्ण अपडेट : बाधित रूग्ण एकुण २६ पैकी शहर (१९) ग्रामीण (७)
सुरेगाव १ ,रवंदा १ , पढेगाव ५ , विवेकानंद नगर २, बालाजी अंगण ४, साई सिटी २ व रुईकर वस्ती, १, गांधीनगर ४, कालेमळा ५, समता नगर १,
वृत्तवेध ऑनलाईन | 27 July 2020,
By: Rajendra Salkar
corona virus
TAGS corona virusSuregoanreport
कोपरगाव : दरम्यान सोमवारी रात्री ५० अहवाल प्राप्त झाले पैकी सात नवे ऍक्टिव्ह रुग्ण आढळून आले, तर ४३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सात पॉझिटिव्ह रुग्णात पढेगाव ४ गांधी नगर २ सुरेगाव १ यांचा समावेश असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना डॉ. फुलसौंदर म्हणाले, सोमवारी (२७जुलै) रोजी रात्री कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील ५० संशयितांचे नमुने नगर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले, अहवाल प्राप्त झाले यात सात जण नवे ॲक्टिव रुग्ण आढळून आले तर उर्वरित ४३ अहवाल निगेटिव आले असे त्यांनी सांगितले.
दरम्यान कोवीड सेंटर मध्ये २६ जण उपचार घेत असून एक जण नाशिक व ६ जण येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर ४० जण होम क्वॉरंटाईन आहेत. अशी माहिती डॉ. वैशाली बडदे (आव्हाड) यांनी दिली.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाटे कोपरगाव ग्रामीण वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे (आव्हाड) रुग्णांवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान लोकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहनही आरोग्य प्रशासनाने केले आहे.नागरिकांनी प्रशासनाने सांगितलेले नियम पाळून, स्वतःची काळजी घेणे आता गरजेचे बनले आहे.





