बिबट्याच्या एंट्रीने कोपरगावात खळबळ; नागरे पेट्रोल पंपावर थरार,
Entry of leopard causes excitement in Kopargaon; Thrilling at Nagre Petrol Pump,
तीन दिवसापासून बिबट्याचा शहरात वावर नागरिक धास्तावलेSince three days, the leopard has been roaming in the city and scared the citizens
वॉकला जाणाऱ्या नागरिकांचे थेट रस्त्यावरूनच वॉक आउट Citizens going for a walk walk out directly from the street
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onFir14 July24,19.00Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : कोपरगाव शहरात बुधवारी सायंकाळी साडेसात आठ वाजेच्या सुमारास नागरे पेट्रोल पंप इथे बिबट्या घुसल्याने पंपा जवळील दुकानदाराची भीतीने त्याची घाबरगुंडी उडाली, परिसरात एकच खळबळ माजली होती. पंपा जवळील तरी दुकानदार याने बिबट्याला पाहिल्यानंतर घुसला बिबट्या, भीतीने सर्वांची घाबरगुंडी उडाली आहे
याची माहिती मिळाली. यावेळी या ठिकाणी मोठी वर्दळ होती तात्काळ वनविभागला पाचारण करण्यात आलं नागरिकांनी फटाके फोडून गोंगाट केल्याने बिबट्या राजपाल सोसायटीकडे निघून गेल्याचे नागरिकांनी सांगितले
याबाबतची अधिक माहिती अशी की, बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास मुर्शदपुर जेऊर पाटोदा या परिसरातून हा बिबट्या शहरात नागरे पेट्रोल पंपावर आला आणि त्यानंतर लोकांनी केलेल्या गोंधळामुळे तो राजपाल सोसायटीच्या बाजूला गेला परंतु रात्री पुन्हा जोशी नगर भागातून तो इंदिरापथ बैलबाजार या रस्त्यावर फिरताना दिसून आला तेथून पुढे असलेल्या कर्मवीर नगर मध्ये काही लोकांना दिसला गुरुवारी दिवसभर बिबट्याने लोकांना दर्शन दिले नाही परंतु शुक्रवारी मात्र खडकी पाण्याची टाकी, गवारे नगर, समता नगर या भागात बिबट्या फिरत असल्याचे एका स्थानिक नागरिकाला बिबट्या दिसल्यानंतर परिसरात ही माहिती पसरली. या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
दरम्यान, कोपरगाव भागात आता सर्रासपणे बिबट्याचा वावर होताना पाहायला मिळतो. इतके दिवस तालुक्यातील मुर्शदपुर व आसपासच्या ऊसाच्या शेतीत बिबट्याचं वास्तव्य आढळत आहे. मात्र आता थेट कोपरगावच्या शहरी भागातही बिबट्या घुसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
चौकट
कोपरगाव शहरात मोठ्या प्रमाणात गाई गाढव डुकरे कुत्रे मोकाट जनावरे मोठ्या प्रमाणात आहेत व ती रस्त्यावर रात्रंदिवस ठिकठिकाणी बसलेली असतात त्यामुळे बिबट्यासारख्या प्राण्याला ही सोपी शिकार असल्याने बिबट्या या परस या परिसरातून लवकर जाणार नाही असे जाणकारांचे मत आहे बिबट्याच्या भीतीमुळे सकाळ-संध्याकाळ मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांनी थेट रस्त्यावरूनच वॉक आउट केले आहे
कोट
ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव यांनी दुपारी वन खात्याच्या अधिकाऱ्यांबरोबर भ्रमणध्वनीवरून संपर्क करून त्यांना बिबट्या शहरात फिरत असल्याच्या गांभीर्याची जाणीव दिली आपण जाळी घेऊन ज्या ठिकाणी बिबट्या फिरत आहे त्या भागात लोकांच्या मदतीने हाकारा देऊन बिबट्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न करू तुम्ही पिंजरा वगैरे तयारी करा असे आव्हान केले आता पोलीस निरीक्षक देसले यांचे आव्हानाला वन विभाग कशा पद्धतीने साथ देतो याकडे गावातील नागरिकांचे लक्ष लागले आहे
Post Views:
242