दहा कोटीच्या झगडे फाटा जवळके रस्त्याचे एकाच पावसात तीन तेरा वाजले

दहा कोटीच्या झगडे फाटा जवळके रस्त्याचे एकाच पावसात तीन तेरा वाजले

Three thirteen o’clock in a single rain on the road near the road worth ten crores

दहा कोटीचा निधी पाण्यात गेला Funds of ten crores went in the water

लोकार्पणाआधीच ठेकेदाराच्या कामाचेही पितळ उघडे पडले आहे Even before the public offering, the brass of the contractor’s work has also been exposed

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onFir14 July24,19.10Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव :  कोपरगाव संगमनेर मार्गावरील झगडे फाटा ते जवळके या दहा ते बारा किलोमीटर रस्त्यासाठी  आमदार आशुतोष काळे यांनी अशी या बँकेकडून   मागील वर्षी  सुमारे दहा कोटी रूपये मंजूर केले होते. महिना दोन महिन्यापूर्वी या रस्त्याचे काम झाले  पण अवघ्‍या  एका पावसात या रस्त्याची पुन्हा वाट लागली असून  डांबरीकरणाचा थर अनेक ठिकाणी  निघून गेल्यामुळे खडी उघडी पडल्याने  लोकार्पणाआधीच ठेकेदाराच्या कामाचेही पितळ उघडे पडले आहे

एकाच पावसात दहा कोटीच्या झगडे फाटा जवळके रस्त्याचे तीन तेरा वाजले
झगडे फाटा ते संगमनेर या रस्त्यावरील टोल नाका गेल्यानंतर तालुक्यातील झगडे फाटा ते जवळके  दरम्यान रस्त्याची गेले कित्येक वर्षापासून  भयंकर दुरावस्था झाली होती. त्यात शिर्डीच्या सुरक्षेच्या कारणाखाली झगडे फाटा मार्गे अवजड वाहनांची वाहतूक या मार्गावरून वळविण्यात आल्याने झगडे फाटा ते रांजणगाव देशमुख या संपूर्ण रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती या रस्त्यावर १० ते १२ किमी अंतरात जीवघेणे खड्डे होते. त्यामुळे रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता अशी बिकट अवस्था झाली होती. खड्डे चुकविण्याच्या नादात रोजच अपघात होत.  यामुळे येथील नागरिकांनी कोपरगाव मतदार संघाचे आमदार आशुतोष काळे  यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून  मागणी केली होती लोकांच्या तक्रारीची व रस्त्याच्या परिस्थितीची दखल घेत आमदार आशुतोष काळे यांनी अशी या बँकेकडून या रस्त्यासाठी दहा कोटीचा निधी मिळविला होता. महिन्या दोन महिन्यापूर्वी  या रस्त्याचे काम झाल्याचे सांगितले जाते या रस्त्यासाठी  मागील वर्षी  सुमारे दहा कोटी रूपये मंजूर केले होते. पण अवघ्‍या  एका पावसात या रस्त्याची पुन्हा वाट लागली असून  डांबरीकरणाचा थर अनेक ठिकाणी  निघून गेला असून खडी उघडी पडली आहे तर काही ठिकाणी  मोठे खड्डे पडले आहेत. 
 
गेल्या काही वर्षापासून कोपरगाव संगमनेरला जाण्यासाठी  नागरिक    सावळी विहीर  ते रांजणगाव देशमुख  या पंतप्रधान सडक  रस्त्याचा वापर करत होते  रांजणगाव देशमुख येथून ते संगमनेरला जात होते परंतु  कोपरगाव हद्दीतील रांजणगाव देशमुख ते निळवंडे हा रस्ता देखील खराबच होता  मधल्या काळात     शिर्डी विमानतळ रस्ता झाल्यामुळे लोक संगमनेरला जाण्यासाठी विमानतळ रस्त्याचा वापर करू लागले होते  निळवंडे ते संगमनेर हा रस्ता  चांगला होता त्यामुळे  निळवंडे ते झगडे फाटा रस्ता होणे गरजेचे होते त्यात रांजणगाव देशमुख ते निळवंडे  या रस्त्याचे काम झालेले होते आता कोपरगाव संगमनेर ला जाण्यासाठी ४. किलोमीटरचा हा रस्ता  चांगला होईल या आशेवर  पोहेगाव जवळके व रांजणगाव देशमुख या परिसरातील नागरिक व कोपरगावच्या नागरिकांनी  सुटकेचा श्वास  घेतला होता  हा रस्ता झाल्यानंतर वेळ व पैसा वाचून कमी वेळात जाता येईल अशी अशा नागरिकांना होती परंतु निकृष्ट कामामुळे ती आशा फोल ठरली आहे.
 पावसाळ्याची सुरुवात झाली असून पहिल्याच पावसात जर रस्त्याची अशी परिस्थिती झालेली असेल तर पुढे येणाऱ्या एक दोन पावसात  तर या रस्त्याचे तीन तेरा वाजल्याशिवाय राहणारच नाही अवघ्या काही  महिन्यातच रस्त्याची वाट लागली
 दहा कोटी रुपये खर्चूनही पुन्हा  या रस्त्याची परीस्थिती पुन्हा जैसे थे झाली  असेल तर   रस्त्यासाठी  केलेला दहा कोटीचा खर्च पाण्यात गेल्याचे दिसून येत आहे. बुजवलेले खड्डे जैसे थे होतात आणि त्यावर झालेला एक कोटीवधीचा खर्च पाण्यात जातो; याबाबत संबंधीत यंत्रणेला काहीच सोयरसुतक नाही.
दहा कोटी रुपये खर्च केल्यानंतरही  वर्षभर सुद्धा लोकांना जर रस्त्याचा जाण्या येण्याचा आनंद घेता येणार नसेल तर ही  शासनाची शुद्ध फसवणूक असून जनतेच्या पैशाची लूट आहे याकडे आमदार आशुतोष काळे यांनी जातीने लक्ष घालून  संबंधित अधिकाऱ्यामार्फत संबंधित ठेकेदारावर कारवाई करून पुन्हा रस्ता दर्जेदार करून घेतला पाहिजे अशी मागणी आता परिसरातील नागरिकाकडून  करण्यात येत आहे .  
  

कोट

या रस्त्याचे काम चालू झाले तेव्हापासून आम्ही त्या ठेकेदाराला रस्त्याचे काम चांगले करण्याच्या सूचना देत होतो परंतु तरीही त्यांनी ऐकले नाही या मार्गावर पोहेगाव  जवळके  रांजणगाव देशमुख   या मोठ्या गावांचा समावेश आहे   या रस्त्यावर मोठी वर्दळ असून त्यात औरंगाबाद कडून पुण्याकडे जाणाऱ्या  अवजड वाहनांचाही समावेश असतो. त्यामुळे हा रस्ता दमदार व दर्जेदार होणे आवश्यक आहे यासाठी दहा कोटीचा भरपूर निधी सुद्धा मिळालेला आहे आता ठेकेदाराकडून पुन्हा ह्या  रस्त्याची डागडुजी करणे गरजेचे झाले आहे.  : शिवाजी रोहमारे पोहेगाव

Leave a Reply

You cannot copy content of this page