तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
वृत्तवेध ऑनलाईन | 28Jul 2020, 13:37
By : Rajendra Salkar
कोपरगाव : शहरात आत्महत्येचे सत्र कायम असून आज सकाळी हनुमान नगरमधील १०५ येथील एका तरुणाने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
सागर राजू पाटील (वय २२ ,रा. हनुमान नगरमधील १०५ ) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. त्याने मंगळवारी २८ जुलै रोजी आठ वाजेच्या पूर्वी राहत्या घराच्या छताला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
याबाबत शेजारी राहत असलेल्या आकाश राजू मोरे यांनी कोपरगाव शहर पोलिसांना खबर दिली सदरवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
मयत सागर हा गवंडी काम करीत होता. घरात तो व त्याचे वडील असे दोघे जणच राहत होते. मंगळवारी (२८ जुलै) रोजी सकाळी उठल्यानंतर त्याचे वडिलांनी हा प्रकार पाहिला, परंतु ते अर्धांगवायुने ग्रस्त असल्याने ते काही करू शकले नाही.
आत्महत्या का केली याचा तपास पोलिस करीत आहेत. अधिक तपास कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बी. एस. कोरेकर करीत आहेत.
आपली प्रतिक्रिया द्या





