पर्यावरणाचा संदेश घेऊन निघाली कोपरगाव पंढरपूर सायकल वारी
Kopargaon Pandharpur Cycle Walk started with the message of environment
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu20July24,19.30Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : दरवर्षीप्रमाणे ‘झाडे लावा, पर्यावरण वाचवा’ असा संदेश देत ३१ जणांच्या सायकलिस्ट क्लबच्या कोपरगाव ते पंढरपूर सायकल वारीने गुरुवारी (२० जुलै) रोजी सकाळी श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान केले शनिवारी २२ जुलैला पांडुरंगाचे दर्शन घेतील
गेल्या दोन वर्षांपासून कोपरगाव येथून सायकलवर पंढरपूरला जात आहेत. ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ या भक्तिभावाने या सायकल वारीत सहभागी झालेले वारकरी प्रवासात वृक्षारोपण, पर्यावरण संतुलन, पाण्याची बचत, व्यसनमुक्ती व आरोग्य संवर्धनाचे महत्त्व पटवून देतात. त्याचबरोबर उत्तम आरोग्यासाठी चांगल्या सवयी जोपासा असा मौल्यवान संदेश या सायकल वारीद्वारे प्रवासादरम्यान जनतेला दिला जातो. यंदाचे तिसरे वर्ष या सायकल वारीमध्ये अमृत संजीवनी शुगरकेन अध्यक्ष पराग संधान, विजय आढाव, प्रशांत होन, विवेक खांडेकर, नितीन त्रिभुवन, संतोष नेरे, संतोष पवार, प्रशांत शहाणे, उमेश लोंढे, प्रशांत निकुंभ, बाळासाहेब निकोले, बापूसाहेब सुराळकर, प्रशांत सुराळकर, अतुल सुराळकर, मनोज आहेर, मोहन आघाव, दीपक बोळीज, कैलास बहिरट, स्वप्नील झावरे, सुधीर खर्डे, महेश थोरे, राजेंद्र निकम, शंकर निकम, मोहन निकम, मनोज कदम, दीपक सुपेकर, संतोष डोखळे, सचिन त्रिभुवन, सचिन शिंदे, सायकल फिटर गंगाराम, चालक असलम आदी सहभागी झाले आहेत.
कोपरगाव सायकलिस्ट क्लबने सुरू केलेला हा सायकल वारीचा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे सांगून या सायकल वारीमध्ये सहभागी झालेल्या वारकरी बांधवांना संजीवनी समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्यासह अनेकांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी टाकळीचे सरपंच संदीप देवकर, दिनेश कोल्हे, प्रसाद नाईक, विवेक परजणे आदी उपस्थित होते. ही