महामंडळाची स्थापना छोट्या समाजांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीच – स्नेहलता कोल्हे
The corporation was set up to bring small communities into the mainstream – Snehlata Kolhe
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat22July24,15.00Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : गुरव , लिंगायत , वडार व रामोशी समाजासाठी महामंडळांची निर्मीती करून ऐतिहासिक निर्णय घेतला. मुळात हा निर्णय छोट्या घटकातील समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीच असल्याचे प्रतिपादन माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केले. महामंडळामुळे त्यांची आर्थिक उन्नती होईल गतीमान सरकार अशी प्रतिमा शिंदे फडणवीस शासनाने यातुन सिध्द केली आहे. असेही त्या म्हणाल्या
राज्याच्या अर्थसंकल्पात इतर मागासवर्गीयांसाठी मोदी आवास घरकुल योजना आणि लहान समाजासाठी महामंडळाची घोषणा करण्यांत आली होती ती शिंदे फडणवीस शासनाने प्रत्यक्षात अंमलात आणली त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासुनची मागणी पुर्ण झाली आहे.
त्याबद्दल तत्कालीन आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांनी अभिनंदन करून वंचित घटकासाठी करीत असलेल्या कामाचे कौतुक करतांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी त्यांच्या वाढदिवसाची जनसामान्यांना आठवणीत राहिल अशी भेट या माध्यमातुन दिली आहे त्यांचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच आहे.
सौ. स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की, मोदी आवास योजनेतुन २०२६ पर्यंत १० लाख घरकुले बांधण्यात येणार असुन पात्र व्यक्तीस यातुन १ लाख २० हजार रूपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ९ वर्षात सर्वसामान्यांच्या उत्कर्षासाठी सातत्याने मोठे निर्णय करून प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांनी २०२३ ते २०२६ या तीन वर्षांत प्रत्येकी तीन लाख घरकुलांचे उद्दिष्ट ठेवुन त्यासाठी १२ हजार कोटी रूपयांचे अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले आहे. राज्यात अनेक वर्षापासून रहिवास करून निवास करीत असलेली असंख्य कुटूंबे असुन त्यांच्या डोक्यावर अजुनही घराचे छप्पर नाही ते मोदी आवास योजनेतून साकारले जाणार आहे. गतीमान सरकार अशी प्रतिमा शिंदे फडणवीस शासनाने यातुन सिध्द केली आहे. इतर मागासवर्गीय घटकातुन या निर्णयाचे स्वागत होत आहे.असेही त्या म्हणाल्या,
Post Views:
211