रक्तदान शिबिर हा रचनात्मक उपक्रम-स्नेहलता कोल्हे
Blood Donation Camp is a constructive initiative-Snehlata Kolhe
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 2Aug24,20.00Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : वेगवेगळ्या महापुरुषांची जयंती व पुण्यतिथी दिनी रक्तदान शिबिरासारखे समाजोपयोगी विधायक व रचनात्मक उपक्रम असून लोकांनी रक्तदानासाठी पुढे आले पाहिजे. असे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदान प्रसंगी केले रक्ताची गरज लक्षात घेऊन स्वयंसेवी संस्था, संघटनांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यासाठी पुढे आले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या
सौ कोल्हे म्हणाल्या रक्तदान हे श्रेष्ठ दान असून, रक्तदानामुळे लाखो लोकांना जीवनदान मिळते. रक्तदान शिबीर हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. युवकांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून रक्तदानासाठी पुढे येऊन अशा समाजोपयोगी उपक्रमांना हातभार लावला पाहिजे, यावेळी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views:
163