चांदेकसारेच्या विकासात खंड पडून देणार नाही – विजय होन
वृत्तवेध ऑनलाईन ।28 July 2020
By: Rajendra Salkar, 16:30
कोपरगाव : चांदेकसारे गावच्या विकासात कदापि खंड पडू देणार नाही असे प्रतिपादन चांदेकसारेचे उपसरपंच विजय होन यांनी केले.
कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे गायत्री कंपनीकडून भैरवनाथ मंदिर ते शिर्डी महामार्गापर्यंत असलेल्या रस्त्याचे काम मार्गी लावताना बोलत होते.
चांदेकसारे ग्रामपंचायतीत कोल्हे गटाची सत्ता आल्यापासून गावच्या विकासाला सुरुवात झाली आहे. गेल्या अडीच वर्षात घरोघरी नळाचे पाणी पोहोचून ग्रामस्थांमध्ये आदराचे स्थान निर्माण केले आहे.केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना ग्रामस्थांपर्यंत पोहचविल्या. अनेक योजनांच्या लाभार्थींपर्यंत लाभ उपलब्ध करून दिला. असल्याचे विजय होन यांनी सांगितले.