कोपरगावमध्ये शांतता समितीची बैठक संपन्न
Peace Committee meeting concluded in Kopargaon
काळे कोल्हे यांच्याकडून सर्वधर्म समभावाचे आवाहन तर पोलिसांचा कडक कारवाईचा इशारा ; Kale Kolhe calls for equality among all religions, while police warns of strict action;
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir 25Aug24,20.20Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : मागील काही दिवसांमध्ये कोपरगाव मध्ये लव जिहाद व त्यानंतर पवित्र कुराण विटंबना या घडलेल्या काही घटनांच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.२५) दुपारी २वाजता शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आ. आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांची प्रमुख उपस्थितीती होती.
आ. आशुतोष काळे म्हणाले, धर्म कुठला याकडे न बघता शहानिशा करून पोलिसांनी कारवाई करावी तर तरुणांनी ही कायदा हातात घेऊ नये कुठे जर काही घटना घडत असेल तर त्याचा शोध घेऊन त्यामध्ये कोण कोण सामील आहे याची पोलिसांनी खात्री केली पाहिजे आरोपीवर कारवाई व्हावी धर्माबाबत काही लोक वाईट असतील परंतु सरसकट धर्माला वेठीस धरणे योग्य नाही. मुलगी कुठल्याही धर्माची असेल आणि समोरचा जर तक्रार द्यायला आला असेल तर पोलिसांनी त्याची तक्रार घेऊन आरोपीला अटक करून योग्य ती कारवाई केली पाहिजे यामध्ये कोणीही कायदा हातात घेता कामा नये, पोलिसांना आरोपी बाबत बहुतेक गोष्टी माहीत असतात त्यांच्या खबऱ्याकडून त्यांना बऱ्याच गोष्टी माहित होतात त्या जर आपण केल्या तर या शहरातील कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहील तेव्हा कुरण विटंबना प्रकरणी आरोपीला लवकरात लवकर शोधून त्याला शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली तर आपल्या शहरातील कायदा सुव्यवस्था आपणच पाळली पाहिजे असे आवाहनही त्यांनी सर्व धर्मियांना केले
यावेळी बोलताना माजी आमदार स्नेहलता कोल्हे म्हणाल्या आपण अनेक वर्षापासून सोबत आहोत यापूर्वी कधीही कोपरगावात सामाजिक प्रेरणा निर्माण होऊन वातावरण दूषित झालेले नाही पण अलीकडे काही घटक वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत पण विशेषतः महिलेवर मुलीवर खूप अन्याय झाला अत्याचार झाला ती कुठल्याही जाती धर्माची समाजाची असेल तर पोलिसांनी पोलीस प्रशासनाने त्या मुलीला महिलेला न्याय देण्याविषयी प्रयत्न केला पाहिजे असे मला म्हणायचे आहे अतिरेकी विचार आतंकवादी विचार या देशासाठी अजिबात सोयीचे नाही म्हणून खऱ्या अर्थाने धर्माभिमान जरूर असा परंतु धर्मांध होऊ नका एवढीच मी आग्रहाची मागणी करते कधी कधी काही न करता ही चर्चा वाढते घटनेची काही माहिती नसताना चर्चा वाढवली जाते तर कधी घटना घडते तेव्हा तर तीव्रतेचा विपर्यास होतो . प्रामुख्याने आपल्याला मिटवायचे आहे पेटवायचे नाही असा विचार करायला पाहिजे प्रामुख्याने तरुणांनी या गोष्टी लक्षात घेण्याची गरज आहे येणाऱ्या सणवार उत्सवा आधीच शांतता कमिटीची मीटिंग घ्यावी अशा सूचना त्यांनी पोलीस प्रशासनाला केल्या
पोलीस प्रशासनाने आक्रोश मोर्चा कोणतीही गालबोट लागून देता व्यवस्थित हाताळला ज्यांनी प्रक्षोभक भाषणे केली त्यांच्यावर गुन्हे दाखल होतीलच, सोशल मीडियावर लिहिताना संयम पाळा सोशल मीडियाच्या माध्यमांतून धार्मिक आणि जातीय भावना दुखावून दोन समाजांत तेढ निर्माण होतील असे स्टेटस, व्हिडिओ क्लिप्स, आक्षेपार्ह मजकूर, एसएमएस तयार करून प्रसारित करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा दिला सोशल मीडियाच्या माध्यमातून तेढ निर्माण करण्याच्या प्रकरणात आत्तापर्यंत तरुणांचा मोठा सहभाग दिसून आलेला आहे तरुणांवर लक्ष ठेवा समाजकंटकांना जात धर्म पंथ नसतो केवळ द्वेष पसरविणे हे त्यांचे लक्ष असते कुराण विटंबना प्रकारातील प्रकरणातील आरोपींना लवकरच अटक करू पोलीस हा सुद्धा एक सामाजिक घटक आहे तेव्हा येणाऱ्या सणात पोलिसाबरोबर समय वय ठेवा असे आव्हान करतानाच गो हत्या करणाऱ्यांना सोडणार नाही त
तडीपारी ची यादी तयार आहे लवकरच त्याची अंमलबजावणी होईल सर्वांनी आपापल्या धार्मिक स्थळावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे किंवा सुरक्षारक्षक नेमावेत त्याचप्रमाणे कोणतीही घटना घडल्यास पोलीस स्टेशनला टोलक्यांनी येण्याची गरज नाही अशी सक्त ताकीद क्षणात जिल्हा पोलीस अधीक्षक ओला यांनी दिली.
यावेळी गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे ठाकरे शिवसेना कैलास जाधव जिल्हाप्रमुख कैलास जाधव, उपजिल्हाप्रमुख असलम शेख रिपाईचे जितेंद्र रणशूर अकबर शेख कृष्णा आढाव मेहमूद सय्यद विजय व हाडणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या
यावेळी श्रीमती स्वाती भोर अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, संदिप मिटके, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी विभाग शिर्डी, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, प्रदिप देशमुख, तालुका पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे,आदींसह शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी, सर्वपक्षीय नागरिक उपस्थित होते.
मागील काही दिवसांमध्ये कोपरगाव मध्ये वादांच्या घटनांना धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याबाबत सर्व पक्षीय पदाधिकार्यांनी यावेळी तीव नाराजी व्यक्त केली. कोपरगाव मध्ये मागील अनेक वर्ष जातीय सलोख्याची परंपरा आहे. त्याला आव्हान देणाऱ्या मंडळींवर कारवाई करावी , तसेच जातीय तेढ निर्माण करणाऱ्या मंडळींवर कारवाई व्हावी, स्थानिक कुणीही या मध्ये हस्तक्षेप करणार नाही टोळक्याने पोलीस स्टेशनला जाण्याची प्रथा बंद करा असा विश्वास यावेळी भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना मनसेसह सर्वपक्षीयांनी व्यक्त केला.
यावेळी जेष्ठ नागरीक विजय बंब, बबलू वाणी विनायक गायकवाड दत्ता काले हशमभाई पटेल मंदार पहाडे, शैलेश साबळे, रवींद्र पाठक विजय वाजे राजेंद्र सोनवणे गुलशन होडे नारायण शेठ अग्रवाल अनिल गायकवाड रियाज सर फकीर कुरेशी आरिफ कुरेशी विरेन बोरावके रमेश गवळी कलविंदर सिंग दडिलाल राजेंद्र वाघचौरे स्वप्निल निखाडे सलीम पठाण संतोष चवंडके, मुन्ना मंसूरी आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी प्रास्ताविक केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी आभार मानले
Post Views:
120