१० कोटी निधी मंजूरीत यश – आ. आशुतोष काळे
10 crore fund sanctioned success – Aa. Ashutosh Kale
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat 26Aug24,16.30Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव :शहराच्या विविध विकासकामांसाठी वैशिष्टेपूर्ण योजने अंतर्गत १० कोटी निधी मंजूर करण्यात यश मिळविले असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.
कोपरगाव शहराचा सर्वांगीण विकासाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी पाणी प्रश्नासाठी तब्बल १३१.२४ कोटी तर ३५ कोटीचा निधी देवून कोपरगाव शहराचा चेहरा मोहरा बदलला आहे. परंतु अजूनही उर्वरित विकास कामांना जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी करीत असलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव शहराच्या विविध विकासकामांसाठी वैशिष्टेपूर्ण योजने अंतर्गत १० कोटी निधी मंजूर करण्यात यश मिळविले असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.
विकासाच्या बाबतीत मागे पडलेल्या कोपरगाव शहराची धुळगाव अशी ओळख पडली होती. त्याचा परिणाम स्थानिक बाजेपेठेवर होवून व्यवसाय मंदावले होते. एकीकडे रस्त्यांची दुर्दशा तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न. अशा परिस्थितीत पाणी प्रश्न सोडविण्याबरोबरच कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासाचे जनतेला दाखविलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहराच्या विकासाला चालना देवून कोटीच्या कोटी विकास निधी आणला आहे. कोपरगाव शहरातील रस्ते चकाचक व्हावेत, भूमिगत गटारी व छोट्या मोठ्या पुलांचा विकास होवून नागरिकांच्या समस्या दूर व्हाव्यात. कोपरगाव शहराची बाजारपेठ पुन्हा फुलावी व कोपरगाव शहराचे सौंदर्य पुन्हा खुलावे हे स्वप्न उराशी बाळगून आ. आशुतोष काळे यांचा विकासकामांना निधी मिळविण्याचा धडाका सुरूच असून त्याच्या अथक प्रयत्नातून महायुती सरकारकडून १० कोटी निधी मिळवीण्यात आ. आशुतोष काळे यशस्वी झाले आहेत.
या १० कोटी निधीतून कोपरगाव शहरातील व्यापारी संकुल, विविध रस्ते, समाज मंदिर, समाजिक सभागृह, शहर सुशोभिकरण तसेच हद्दवाढ झालेल्या भागाचा देखील विकास कामे होणार आहेत. यामध्ये कोपरगाव शहरातील कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील जब्रेश्वर मंदिर ते आण्णाभाऊ साठे पुतळा रस्ता डांबरीकरण करणे (१.५० कोटी), कोपरगांव नगरपरिषद हद्दीतील कोपरगांव बस स्टॅन्ड ते हॉटेल स्पॅन पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे (५० लक्ष),प्र. क्र. १ मधील आय.टी.आय. कॉलेज समोरील रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे (४० लक्ष), नगरपालिका हद्दवाढ झालेल्या भागातील नागरे पेट्रोल पंप ते ब्रिजलाल नगर रस्ता डांबरीकरण करणे (३० लक्ष), प्र. क्र. १४ मधील गोदावरी नदी ते नगर मनमाड हायवे ते शुक्लेश्वर महाराज मंदिराकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे (४० लक्ष), प्र.क्र.१०मधील सर्व्हे नंबर १०५ मध्ये श्री हनुमान मंदिर व माऊली मंगल कार्यालय परिसर सुशोभिकरण करणे (१० लक्ष), प्र. क्र.०३ ठक्कर घर ते साईबाबा मंदिर रस्ता काँक्रिटीकरण करणे (१० लक्ष), प्र.क्र.३ व्यापारी धर्मशाळा दक्षिण बाजू रस्ता काँक्रिटीकरण करणे (१० लक्ष), प्र.क्र.२ स्वामी समर्थ मंदिर सुभद्रानगर (२०४) सामाजिक सभागृह बांधणे (१० लक्ष), प्र.क्र.०८ संजय नगर वडार समाज सर्व्हे नंबर २२२५ समाज मंदिर बांधणे (१० लक्ष), भावसार समाज साई लक्ष्मी नगर प्रभाग क्र.२ समाज मंदिर बांधणे (१० लक्ष), वसिम खाटिक घर ते शकील शेख घर रस्ता मजबुतीकरण करणे. प्रभाग क्र.७ (१५ लक्ष), फकीर कुरेशी ते हाजी मंगल कार्यालय रस्ता डांबरीकरण करणे प्रभाग क्र.८ (१० लक्ष), कोपरगांव नगरपरिषद हद्दीतील आरक्षण क्र.३८ मध्ये पोस्टाजवळ भाजी मार्केट व व्यापारी संकुल उभारणी करणे (०१ कोटी), कोपरगांव नगरपरिषद हद्दीतील बाजारतळ आरक्षण २९ मध्ये व्यापारी संकुल बांधकाम करणे (०१ कोटी), सर्व्हे नंबर १०५ मध्ये सुशोभिकरण करणे (इंडोर गेम हॉल) (०१ कोटी), सर्व्हे नंबर १९५/१४ मध्ये गुजराथी समाजासाठी समाज मंदिर बांधकाम करणे (१०लक्ष),नगरपालिका नवीन प्रशासकीय इमारत फर्निचर करणे (१.५० कोटी),.गजानन नगर गोरोबा नगर रस्त्यावरील सि.डी. वर्क करणे (३० लक्ष), सर्व्हे नंबर १०५ प्रभाग क्र. १२ मधील उर्दू शाळा बांधकाम करणे (३० लक्ष), सर्व्हे नंबर १०५ प्रभाग क्र. १२ मध्ये लिंभारा मैदान जवळ श्री स्वामी समर्थ मदिर परिसर सुशोभिकरण करणे व पेव्हर ब्लॉक बसविणे (१० लक्ष), सर्व्हे नंबर १०५ प्रभाग क्र. १२ दत्तनगर मध्ये श्री दत्त मंदिर परिसर सुशोभिकरण करणे (१० लक्ष), प्रभाग क्र.३ सैनिकी वसतीगृह ते चित्रकला महाविद्यालय रस्ता डांबरीकरण करणे (२५ लक्ष), प्रभाग क्र. ३ मधील साईबाबा मंदिर ते खंडोबा मंदिर रस्ता कॉक्रिटीकरण करणे (२० लक्ष), प्रभाग क्र. ३ मधील सर्व्हे नंबर १९१६/१९१७ सामाजिक बौद्ध समाजासाठी बुद्धविहार बांधणे (१० लक्ष), प्रभाग क्र. ८ मधील सर्व्हे नंबर १८/ ९२ अरफात मस्जिद बांधणे (१० लक्ष) हि विकास कामे होणार आहेत. कोपरगाव शहराच्या विविध प्रभागातील प्रलंबित विकास कामांना आ. आशुतोष काळे यांनी निधी देवून नागरिकांच्या अडचणी सोडविल्या बद्दल वडार समाज, भावसार समाज, मुस्लीम समाज, गुजराथी समाज तसेच बौद्ध समाजाच्या नागरिकांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे. कोपरगाव शहराच्या विकासासाठी १० कोटी निधी मंजूर केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजित पवार यांचे कोपरगाव शहरातील जनतेच्या वतीने आभार मानले आहे.