कोपरगाव शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यातील रिक्त पदे भरा -स्नेहलता कोल्हे  

कोपरगाव शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यातील रिक्त पदे भरा -स्नेहलता कोल्हे

Fill Vacancies in Kopargaon City and Rural Police Station -Snehlata Kolhe

“पोलिस अधीक्षक राकेशकुमार ओला यांच्याकडे  मागणी Request to Superintendent of Police Rakesh Kumar Ola

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat 26Aug24,16.40Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : कोपरगाव शहर आणि ग्रामीण पोलिस ठाण्यात पोलिस बळ अपुरे असल्यामुळे पोलिसांवर कामाचा ताण वाढला आहे. कोपरगाव शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यातील रिक्त पदे  आपण वैयक्तिक लक्ष घालून ही रिक्त असलेली पदे तातडीने भरावीत अशी मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी शुक्रवारी (२५ ऑगस्ट)रोजी कोपरगाव येथे जिल्हा पोलिस अधीक्षक राकेशकुमार ओला यांच्याकडे केली आहे.वाढत्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे आहे   असे ही त्या म्हणाल्या, 

याप्रसंगी अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, पोलिस उपाधीक्षक संदीप मिटके, कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख, ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश येशीकर हेही उपस्थित होते.

स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, यापूर्वी कोपरगाव शहर व ग्रामीण (तालुका) अशा दोन स्वतंत्र पोलिस ठाण्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. सद्य:स्थितीत कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात ३ पोलिस अधिकारी, ४१ कर्मचारी कार्यरत असून, ११ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात २ अधिकारी कार्यरत असून, त्यापैकी एका अधिकाऱ्याची बदली झाली आहे, तर ३९ पोलिस कर्मचारी कार्यरत आहेत. ग्रामीण पोलिस ठाण्यात १ सहाय्यक पोलिस निरीक्षक व २ पोलिस उपनिरीक्षक अशा ३ पोलिस अधिकाऱ्यांची व १४ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. दोन्ही पोलिस ठाण्यांमध्ये एकूण २५ पदे रिक्त आहेत.

स्नेहलता कोल्हे म्हणाल्या कोपरगाव हे नगर-मनमाड महामार्गावर वसलेले आहे. कोपरगाव शहरासह तालुक्यात गेल्या काही दिवसांत चोऱ्या, घरफोड्या व इतर गुन्हेगारी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. काही समाजकंटकाकडून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. अशा वेळी वाढत्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी तसेच आगामी काळातील सण, उत्सव लक्षात घेऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने कोपरगाव शहर आणि ग्रामीण पोलिस ठाण्यात पुरेशी कुमक असणे अत्यावश्यक आहे. असे  त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेशकुमार ओला यांच्या निदर्शनास आणून दिले. कोपरगाव शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यातील रिक्त पदे भरण्यासंबंधी आपण यापूर्वी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन पाठपुरावा केला असून, याबाबत त्वरित योग्य कार्यवाही व्हावी, अशी मागणी त्यांनी ओला यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page