येसगावच्या विकासाची वाटचाल कायम सुरू राहील -स्नेहलता कोल्हे
The development of Yesgaon will continue forever – Snehlata Kolhe
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat 26Aug24,16.50Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त आदर्श येसगावच्या विकासासाठी माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून कोल्हे परिवार व संजीवनी उद्योग समुहाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल,व यापुढील काळातही येसगावच्या विकासाची वाटचाल अशीच कायम सुरू राहील, असे स्पष्ट संकेत माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी गुरुवारी (२४ऑ.) रोजी येसगाव ग्रामपंचायतच्या वतीने आयोजित कार्यक्रमात केले.
यावेळी रस्ते, पाणी, पथदिवे, गटार, पेव्हर ब्लॉक, सिमेंट कॉँक्रिट रस्ते या कामासह एलईडी बल्बचे वितरण तसेच अंगणवाडी केंद्रामार्फत गरोदर माता आणि लहान बाळांचे वजन करण्यासाठी वजनकाट्याचे वितरण स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.
स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, येसगाव ही स्व. शंकरराव कोल्हे यांची जन्मभूमी व कर्मभूमी आहे. येसगावच्या प्रगतीमध्ये स्व. शंकरराव कोल्हे यांचे मोलाचे योगदान आहे.त्यांनी येसगाव ग्रामपंचायतला माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते आदर्श गाव म्हणून प्रथम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
विकासकामे मार्गी लावण्यासाठी माझ्यासह संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे व कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांचे येसगाव ग्रामपंचायतला नेहमीच सहकार्य राहिलेले आहे. भविष्यातदेखील येथील विकासकामांसाठी कोल्हे परिवार व संजीवनी उद्योग समूह यांच्याकडून ग्रामपंचायतला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. स्व. शंकरराव कोल्हे यांचे ग्रामविकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायतचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सातत्याने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी सरपंच पुंडलिक गांगुर्डे, उपसरपंच संदीप गायकवाड, राजेंद्र कोल्हे, सचिन कोल्हे, सुधाकर कुलकर्णी, गोरख आहेर, बापूसाहेब सुराळकर, शिवाजी कोकाटे, शंकरराव पाईक, उत्तमराव पाईक, कपिल सुराळकर, अमोल झावरे, राजेश आहेर, ज्ञानेश्वर (बंडू) आदमाने, दत्तात्रय आहेर, चंद्रकांत शिवरकर, गुलाब तांबोळी, दिनेश कोल्हे, अर्जुन लासनकर, भास्कर आहेर, सीताराम पाईक, विष्णुपंत सुराळकर, किरण गायकवाड, अतुल सुराळकर, बाळासाहेब गायकवाड, अक्षय आहेर, ग्रामसेवक गायकवाड आदींसह येसगाव येथील ग्रामस्थ, ग्रा. पं. पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views:
150