ब्राह्मणगाव व परिसरातील गावांच्या विजेच्या समस्या कायमच्या सूटणार – आ. आशुतोष काळे

ब्राह्मणगाव व परिसरातील गावांच्या विजेच्या समस्या कायमच्या सूटणार – आ. आशुतोष काळे

Electricity problems of Brahmanagaon and nearby villages will be solved forever – Aa. Ashutosh Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat 26Aug24,17.00Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : मतदार संघातील   ब्राम्हणगाव सबस्टेशनसाठी ३ कोटी रुपये निधी दिला आहे. येत्या काही दिवसात ब्राम्हणगाव सबस्टेशनचे काम पूर्ण होवून ब्राम्हणगाव व परिसरातील गावांच्या विजेच्या समस्या कायमच्या सुटणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

आ. आशुतोष काळे यांनी दिलेल्या ३ कोटी निधीतून सुरु असलेल्या ब्राह्मणगाव सबस्टेशनच्या ११ किमी ३३ के.व्ही. लाईन टाकणे, ५ एम.व्ही.ए. ट्रान्सफॉर्मर बसवणे ई. कामांची व तीर्थक्षेत्र विकास निधीअंतर्गत ५० लक्ष रुपये निधीतून सुरु असलेल्या श्री जगदंबा माता मंदिराच्या कामाची पाहणी केली. तसेच  ब्राह्मणगाव येथे १० लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या आहेर वस्ती ते बदापुर रस्ता खडीकरण कामाचे व ७ लक्ष रुपये निधीतून बसवण्यात आलेल्या ओपन जिम साहित्याचे लोकार्पण आ. आशुतोष काळे यांनी केले 
अजूनही काही रस्त्यांचा विकास होणे बाकी असून या रस्त्यांचे प्रस्ताव शासन दरबारी मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून लवकरच सर्वच रस्त्यांचा विकास होवून नागरिकांच्या अडचणी सुटणार आहेत.  यावेळी राजभवनात जनसंपर्क अधिकारी सहाय्यक म्हणून निवड झाल्याबद्दल सीताराम पवार व पोलीस दलात निवड झाल्याबद्दल किरण माळी यांचा आ. आशुतोष काळे यांनी सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी  श्रावण आसने, अनिल कदम,   विठ्ठलराव आसने,  शिवाजीराव देवकर,  ज्ञानदेव गवारे,  तुकाराम उळेकर,  गणेश आहेर, किसन आहेर, विलास साबळे, सचिन आसने, रविंद्र पिंपरकर, विठ्ठल शिंदे, सचिन कांबळे, बाबासाहेब जगताप, शशिकांत देवकर, रमेश बर्डे, सीताराम पवार, बबन माकोने, गणेश पळसकर, किरण कुदळे, सीताराम आहेर, बाबासाहेब आसने, अशोक शिरसाठ, अंबादास वायखिंडे, निलेश कुलकर्णी, देवीदास आहेर, विलास मोरे, चांगदेव आसने, बाळासाहेब देवकर, बाबासाहेब गायकवाड, अशोक बनकर, नानासाहेब सोनवणे, गणेश वाकचौरे, वाल्मिक जगधने, किरण मोरे, जालिंदर उळेकर, भूषण कुलकर्णी, पांडुरंग सोनवणे, सर्जेराव घायतडकर, विकास बेंद्रे, मुकुंद इंगळे, वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता लक्ष्मण राठोड, सहाय्यक अभियंता किशोर घुमरे, अनिकेत निरभवणे, सार्वजनिक बांधकाम  अभियंता गौरव सोनवणे, पाटबंधारे विभागाचे सुनील काळे,  संदीप भेडांगे, सचिन दारोकर, ग्रामसेवक विजय पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page