बेकायदेशीर जमावाचा एकमेकांवर जीवघेणा हल्ला २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल; पाच जणांना अटक १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी
Fatal attack by illegal mob on each other, case registered against 22 persons; Five persons arrested, 14 days judicial custody
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon 28Aug24,17.00Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : बेकायदेशीर जमाव जमवून शिवीगाळ करून एकमेकांविरुद्ध जाणीवपूर्वक जीवघेणा हल्ला केला वीस पंचवीस जणांच्या जमावाने एकमेकावर लाकडी दांडे, लोखंडी गज , दगड विटांचे तुकड्याने जीवघेणा हल्ला केला. या घटनेमध्ये शितल सुनील पगारे ही महिला गंभीर जखमी झाली. याप्रकरणी कोपरगाव पोलिस ठाण्यात १७ जणांसह एकूण २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.पाच जणांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याची माहिती तपासी अधिकारी सपोनी महेश येसेकर यांनी दिली.
हि घटना रविवारी (दि २७ ऑ) रोजी रात्री दहा ते पावणे अकरा वाजेच्या दरम्यान मावळा चौफुला, आचारी हॉस्पिटल गांधीनगरमध्ये घडली.याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण अंकुश घुले यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्रीच्या दहा ते पावणे अकरा वाजेच्या सुमारास मावळा चौफुला आचारी हॉस्पिटल गांधीनगरमध्ये बेकायदेशीर जमाव जमवून शिवीगाळ करून एकमेकांविरुद्ध जाणीवपूर्वक जीवघेणा हल्ला केला वीस पंचवीस जणांच्या जमावाने एकमेकावर लाकडी दांडे, लोखंडी गज , दगड विटांचे तुकड्याने जीवघेणा हल्ला केला. या घटनेमध्ये शितल सुनील पगारे यांना गंभीर दुखापत करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी प्रवीण पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण अंकुश घुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात एजाज सलिन शेख, साहिल गुलाब शेख, ईरफान शकील शेख, ऋतिक कु-हाडे, वैभव मुकेश कु-हाडे, चेतन जाधव, कुणाल भंडारी, पवन रोकडे, गुडी उर्फ विशाल गुलाम वाडेकर, सलीम लतिफ शेख, किरण शिवलाल लहिरे, फैसल कागद शेख, अनु शाबान पठाण, गुलाब सांडु शेख, नकुल धर्मराज ठाकरे, अजय पाटील, मु-या उर्फ करण गायकवाड व ईतर ४ ते ५ अनोळखी इसम यांच्यावर गुरनं ४१३/२०२३ भादवि कलम ३०८, ३२३, १४३, १४७,१४८,१४९,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणी नकुल धर्मराज ठाकरे, अबू शबान पठाण, किरण शिवलाल अहिरे , सलीम लतीफ शेख, गुलाब सांडू शेख या पाच जणांना अटक केली असून सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना अकरा सप्टेंबरपर्यंत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे . शहर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी महेश येसेकर हे पुढील तपास करीत आहेत.
गेल्या काही दिवसापासून कोपरगाव शहरात तणावाचे वातावरण आहे त्यात या घटनेने मोठी खळबळ उडवून दिली आहे परंतु पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईमुळे चांगलाच वचक निर्माण झाला आहे अशी चर्चा सध्या सुरू आहे
Post Views:
80