आहे त्यात समाधान मानून आनंदाने जगले पाहिजे, – स्नेहलता कोल्हे
One should be satisfied with it and live happily, – Snehlata Kolhe
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 29Aug24,20.00Pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : जीवन फार सुंदर आहे. जास्तीच्या अपेक्षा व हव्यास न ठेवता परमेश्वराने जे दिले आहे त्यात समाधान मानून आनंदाने जगले पाहिजे, असे सुंदर विचार माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी मंगळवारी (दि२९) रोजी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय अध्यात्मिक ध्यान केंद्रात रक्षाबंधन कार्यक्रमात व्यक्त केले.
यावेळी राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंतीदीदी (नाशिक) व सरलादीदी (कोपरगाव) यांची प्रमुख उपस्थिती होती
स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की,
चिता ही मेलेल्या माणसांना जाळते, तर चिंता ही जिवंत माणसांना जाळते. आजकाल प्रत्येक माणूस डोक्यावर चिंतेचे ओझे घेऊन जगताना दिसतो. आपण चांगल्या गोष्टीऐवजी दु:खाचा जप करत मानसिक तणावाखाली जगतो आहोत. त्यामुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे. जीवन फार सुंदर आहे. जास्तीच्या अपेक्षा व हव्यास न ठेवता परमेश्वराने जे दिले आहे त्यात समाधान मानून आनंदाने जगले पाहिजे, ब्रह्माकुमारीज परमात्मा अनुभूती भवनची वास्तू कोपरगावच्या वैभवात भर टाकणारी आहे. हे केंद्र सर्वांना ऊर्जा देत आहे.
यावेळी ब्रह्माकुमारी वासंतीदीदी सरलादीदी यांनी रक्षाबंधन सणाचे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट केले. सर्वांनी आध्यात्मिक ज्ञान आत्मसात करून ईश्वरी मार्गाने मार्गक्रमण करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्व उपस्थित मान्यवरांना राखी बांधून प्रसादाचे वाटप केले. यावेळी शहीद सुभेदार सुनील रावसाहेब वलटे (रा. दहेगाव बोलका) यांची वीरपत्नी मंगलाताई वलटे, स्वप्नील निखाडे, ॲड. अशोक टुपके, ज्येष्ठ नागरिक सेवा मंचच्या अध्यक्षा सुधाभाभी ठोळे आदी मान्यवर उपस्थित होते.