कवयित्री ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई “शिवकन्या” राज्य पुरस्काराने सन्मानित
Poet Aishwarya Lakshmi Satbhai “Shivakanya” awarded with State Award
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 30Aug24,20.00Pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : कोपरगाव येथील माजी नगराध्यक्ष कवयित्री ऐश्वर्यालक्ष्मी संजय सातभाई यांना वीरमाता सौ. सुषमा मांडवगणे शहीद स्कॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांच्या मातोश्री व चित्रपट निर्माता, दिग्दर्शक तथा सुप्रसिद्ध साहित्यीक रामदास फुटाणे यांच्या हस्ते शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशिय संस्था नाशिक राज्यस्तरीय ‘शिवकन्या महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ शनिवारी (दि२६) रोजी दुपारी महाकवी कालिदास कलामंदिर, नाशिक येथे प्रदान करण्यातआला.अध्यक्षस्थानी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड प्राप्त डॉ. प्रज्ञाताई पाटील, या होत्या.
यावेळी विशेष अतिथी न्यायाधीश वसंतराव पाटील जलदगती न्यायालय, मुंबई. तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. नितीन बानुगडे पाटील,
प्रेरणादायी वक्ते व इतिहास अभ्यासक हे होते
सौ ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई या गेल्या पंचवीस वर्षापासून कोपरगाव नगरपालिकेमध्ये नगरसेवक नगराध्यक्ष म्हणून समाजसेवा करीत आहेत कवयित्री म्हणून त्यांनी गेल्या २५ वर्षांमध्ये हिंदोळा मनाचा व सैरभैर हे दोन कवितासंग्रह प्रकाशित केले असून तिसरा कवितासंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे. गेली अनेक वर्षे कोपरगाव शहरातील कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय या सर्वच क्षेत्रात त्यांना खंडेश्वर देवस्थान म्हाळादेवी अकोला अकोला यांच्यातर्फे आदर्श महिला पुरस्कार २०१३ कवी अनंत फंदी उत्कृष्ट साहित्य कृती पुरस्कार २०१५ राज्यस्तरीय दलित साहित्य संमेलन पुरस्कार २०१५ राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार अहमदनगर २०१५ ब्राह्मण समाज महाराष्ट्र महिला भूषण पुरस्कार केज (जि. बीड) २०१६
या विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशिय संस्था , पंचवटी, नाशिक(कार्यक्षेत्र, महाराष्ट्र राज्य) संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ माधवराव पाटील, समस्त शिवपुत्र संस्था परिवार सदस्य, पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
चौकट
माजी नगराध्यक्ष कवयित्री ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई यांना शिवकन्या या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानंतर महिला बचत गटाचे सक्षम नेतृत्व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी त्यांचा सत्कार केला
Post Views:
198