दुष्काळी परिस्थिती हाताळून ठोस पावले उचला; स्नेहलता कोल्हे
Take concrete steps to deal with drought conditions; Snehlata kohle
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onSat 2Sep24,17.30Pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : पावसाने ओढ दिल्याने तालुका दुष्काळाच्या छायेत, पिके करपली, धरणसाठा केवळ पिण्यासाठीच, सिंचनासाठी पाणी मिळणे धूसर, वीज, जनावरांचा चारा आदी प्रश्न गंभीर बनले आहेत. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन जबाबदारीने दुष्काळी परिस्थिती हाताळून ठोस पावले उचलावीत अशा सक्त सूचना माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
मतदार संघातील विविध प्रश्नाबाबत शनिवारी (दि २) रोजी अचानक तहसील कार्यालयात आलेल्या स्नेहलता कोल्हे यांनी पाटपाणी, विजेचा प्रश्न, गतवर्षी सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीपोटी शासनाकडून देण्यात येणारे अनुदान, पीक विमा तसेच नागरिकांना बिबट्यापासून होत असलेल्या त्रासाबाबत विविध मागण्यांचे निवेदन
तहसीलदार संदीपकुमार भोसले यांना
सादर केले. यावेळी त्यांनी अधिका-याची बैठक घेतली.
या बैठकीत कोपरगाव तालुक्यात पावसाअभावी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे तात्काळ दुष्काळ जाहीर करावा आणि पाणी, चारा डेपो, वीज, अग्रीम पीक विमा वाटप व दुष्काळ निवारणासाठी आवश्यक उपाययोजना तात्काळ करण्याची आग्रही मागणी केली.
जलसंपदा विभागाने सध्या सुरू असलेल्या खरीप पिकांच्या आवर्तनाचे व्यवस्थित नियोजन करावे व प्रत्येक शेतकऱ्याला शेतीसाठी वेळेवर पाणी मिळावे, याबाबत कार्यवाही करण्यासाठी संबंधितांना आदेश द्यावेत.
दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने कोपरगावचे हक्काचे पाणी इतरत्र सोडण्यात येऊ नये. वीज वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे सततचे भारनियमन त्वरित बंद करून शेतीसाठी अखंडपणे पूर्ण दाबाने सुरळीत वीजपुरवठा करण्याबाबतचे महावितरण कंपनीस आदेश द्यावेत
कोपरगाव, दहेगाव बोलका, रवंदे व कोकमठाण या सर्कलमधील एकाही शेतकऱ्याला सततच्या पावसाचे अनुदान अद्याप मिळालेले नाही. सदर अनुदानापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना हे अनुदान तातडीने मिळण्यासाठी कार्यवाही व्हावी,
सर्वच महसुली मंडळांमधील शेतकऱ्यांना सरसकट २५ टक्के अग्रीम पीक विमा मंजूर करून पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना तातडीने वितरीत करण्याचे आदेश पीक विमा कंपनीला द्यावेत.ऑनलाईन ऐवजी पीक पाहणी शासनाकडून व्हावी.
स्थानिक लोकप्रतिनिधीने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर संबंधित शासकीय अधिका-यांची आढावा बैठक का घेतली नाही? स्थानिक आमदार केवळ फोटोबाजी करून प्रसिद्धीचा स्टंट करत असल्याची टीका स्नेहलता कोल्हे यांनी केली.
याप्रसंगी जलसंपदा विभागाचे गोदावरी डावा कालवा कोपरगाव उपविभागाचे अभियंता सचिन ससाणे, महावितरण शाखा अभियंता योगेश सोनवणे, श्री.दीक्षित, साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष डी. आर. काले, कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव, संचालक बाळासाहेब वक्ते, विश्वासराव महाले, शिवाजी वक्ते, केशव भवर, राजेंद्र परजणे, कालूअप्पा आव्हाड, सतीश केकाण, संदीप देवकर, रवींद्र आगवन, दीपक चौधरी, किसन गव्हाळे, विजय आढाव, वैभव आढाव, प्रसाद आढाव, राजकुमार दवंगे, रामदास शिंदे,प्रभाकर शिंदे, चंद्रकांत वाघमारे, स्वप्नील मंजुळ, गणेश साबळे,कैलास चांदे,निखिल सानप,अतुल सुराळकर,प्रकाश दवंगे, यादवराव संवत्सरकर,किरण गायकवाड, प्रशांत आढाव आदींसह विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष, संचालक, शेतकरी, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट……
या बैठकीत शेतकऱ्यांचा सध्य परिस्थिती विरोधात तीव्र असंतोष पहावयास मिळाला. शेतकऱ्यांनी आक्रमकपणे प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली. तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने स्नेहलता कोल्हे यांनी प्रशासनाला परिस्थिती जबाबदारीने हाताळण्याची सक्त ताकीद दिली.
Post Views:
116