आर जे एस  नर्सिंगच्या ३६ विद्यार्थ्यांची रुबी हॉस्पिटल मध्ये नोकरीसाठी निवड 

आर जे एस  नर्सिंगच्या ३६ विद्यार्थ्यांची रुबी हॉस्पिटल मध्ये नोकरीसाठी निवड

Selection of 36 RJS Nursing students for job in Ruby Hospital

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onSat 2Sep24,17.40Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : –  तालुक्यातील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाऊंडेशन नर्सिंग कॉलेजच्या B.Sc नर्सिंगच्या अंतिम वर्षातील ३६ विद्यार्थ्यांची पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये नोकरीसाठी निवड करण्यात आली असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे जारी करण्यात आली 

रुबी हॉल हॉस्पिटल च्या वतीने २६ ऑगस्ट रोजी कोपरगाव येथे या सर्व विद्यार्थ्यांची थेट मुलाखत सिनिअर मॅनेजर मृणल उजागरे,उप अधीक्षक मोहम्मद सदामुद्दीन,सहाय्यक अधीक्षक विन्नारसी सेलवम, शिक्षक परिचारिका श्रद्धा दळवी,या  अधिकाऱ्यांनी घेतली होती. यास ३६ च्या ३६ सर्व विद्यार्थ्यांची रुबी हॉस्पिटलमध्ये नोकरीसाठी निवड झाल्याची माहिती रुबी ऑल हॉस्पिटल च्या वतीने शनिवारी (दि २)  रोजी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाऊंडेशन नर्सिंग कॉलेजला कळविण्यात आले आहे
ग्रामीण भागात असूनही अवघ्या चार वर्षात आर जे एस नर्सिंगमध्ये  अतिशय चांगल्या प्रकारे शिक्षण मिळत असल्याने अंतिम निकालापूर्वीच  नामांकित रुबी हॉस्पिटल पुणे येथे नोकरीसाठी विद्यार्थ्यांची निवड झाल्यानंतर  संस्थेचे अध्यक्ष चांगदेव कातकडे यांनी निवड झालेल्या विद्यार्थी व त्यांचे पालक यांना शुभेच्छा देताना पुढील काळातही आपली संस्था दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.
सचिव प्रसाद कातकडे, डॉ.पूजा कातकडे, विजय कडू,दीपक कोटमे  मॅनेजमेंटच्या वतीने नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.इरशाद अली,उप प्राचार्य डॉ.सुरेश जिल्स व सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले, विद्यार्थ्यांच्या निवडीमुळे पालक वर्गात आनंद व समाधान व्यक्त करण्यात येत आहे

Leave a Reply

You cannot copy content of this page