विद्यार्थ्यांचे अभ्यासाबरोबरच इतर गुण व कौशल्य विकसित व्हावे यासाठीच कार्यशाळा – प्राचार्य डॉ. नितीन जैन
The workshop is for students to develop other qualities and skills along with their studies – Principal Dr. Nitin Jain
लाईफ स्किल्स आणि सॉफ्ट स्किल्स चार दिवसाची कार्यशाळा संपन्नLife Skills and Soft Skills 4 days workshop concluded
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onSat 2Sep24,19.40Pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : कार्यशाळा प्रशिक्षणामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन त्यांचा करिअरकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. त्यासाठी मुलांनी जास्तीत जास्त उपक्रमांमध्ये सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ.नितिन जैन यांनी लाईफ स्किल्स आणि सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षण कार्यशाळेत मार्गदर्शन करताना केले. विदयार्थ्यांना अभ्यासक्रमाबरोबर इतर गुण व कौशल्य विकसित व्हावेत, यासाठी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाऊंडेशन नेहमीच प्रयत्नशिल असते. असेही ते म्हणाले कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष चांगदेव कातकडे हे होते
कोकमठाण येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशन संचलित कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयात (दि. २९) ते (दि०१) चार दिवसाची रूबिकॉन ट्रेनिंग इन्स्टिट्यूतर्फे लाईफ स्किल्स आणि सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती़ .
तृतीय व चतुर्थ वर्षातील बी. फार्मसी विद्यार्थ्यांसाठी त्यांचा सर्वांगिण विकास होऊन, रोजगार क्षमतेत वाढ, व्यक्तिमत्व विकास तसेच, वेळेचे नियोजन, किमान कौशल्य, लेखन कौशल्य, संवाद तंत्र, मुलाखत तंत्र याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती टायपिंग चालू आहे. प्रशिक्षण कार्यशाळेत शिष्टाचार आणि लेखनातील संवादाच्या योग्य टोनसह ईमेल लेखनाच्या कलेची ओळख करून देण्यात आली. मेंदू प्रशिक्षण उपक्रमांने कार्यशाळेचा समारोप करण्यात आला .
यावेळी रूबिकॉन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तर्फे प्रशिक्षक म्हणून मुश्किम सय्यद, कु. कोमल नगरे व कु. स्नेहल नगरे यांनी कार्यशाळेत विदयार्थ्यांना लाईक स्किल्स, सॉफ्ट स्किल, कम्युनिकेशन स्किल, इंटरव्यू व प्रेसेंटेशन स्किल प्रात्यक्षिक स्वरूपात शिकविले.
सचिव प्रसाद कातकडे, विश्वस्त दिपक कोटमे , प्रसिद्ध उद्योजक . ज्ञानेश्वर सिनगर व विजय कडू यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले.कु. श्वेता काळे, मानसी पाचपुते,भक्ती पवार, गायत्री काळे, आदी विदयार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यशाळेचे नियोजन ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा. एस.जी. लावरे यांनी केले
प्रा. सौ. कावेरी चौधरी-कदम यांनी सूत्रसंचालन केले. शेवटी संस्थेचे सचिव प्रसाद कातकडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले
तसेच कार्यक्रम यशस्वितेसाठी उपप्राचार्य प्रा. सौ.उषा जैन प्रा. विजय जाधव, प्रा. करवीर आघाडे, प्रा. सचिन आगलावे, प्रा. सुरज बेंद्रे, प्रा. सौ उत्कर्षा लासुरे-चौधरी व इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Post Views:
102