कोपरगावात युवक सैन्यभरती अकॅडमी स्थापन करणार – विवेक कोल्हे

कोपरगावात युवक सैन्यभरती अकॅडमी स्थापन करणार – विवेक कोल्हे

Vivek Kolhe will set up Youth Army Recruitment Academy in Kopargaon

एक राखी जवानांसाठीA rakhi for jawans

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onTue 5Sep24,20.20Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : तालुक्यातील व आसपासच्या परिसरातील अधिकाधिक युवक सैन्य दलात भरती होण्यासाठी कोपरगाव येथे लवकरच एक अकॅडमी स्थापन करण्यात येईल, अशी ग्वाही संजीवनी युवा  प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी  मंगळवारी  (दि.५) रोजी येवला रोडवरील मशाल चौकात संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या एक राखी जवानांसाठी या उपक्रमाच्या समारोपप्रसंगी दिली.

प्रारंभी अमर जवान स्मृतिचिन्ह, भारतमाता व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 
विवेक कोल्हे पुढे म्हणाले की,  सैनिकांच्या त्यागाची, बलिदानाची जाणीव ठेवून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करून त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना मान-सन्मान देणे हे आपल्या सर्वांचे आद्यकर्तव्य आहे. सैनिक देशासाठी लढत असले तरी देशातील नागरिकांनीही सैनिकांप्रमाणे आपल्या कार्यातून देशसेवा केली पाहिजे, असे आवाहन  करतानाच ते म्हणाले, संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या  ‘एक राखी जवानांसाठी’  या उपक्रमाला कोपरगाव तालुक्यासह राज्यभरातून जवानांनासाठी माता-भगिनींनी १५ हजारांवर राख्या प्रतिष्ठानकडे जमा केल्या आहेत. आम्ही या सर्व राख्या आणि आपले संदेश राजस्थानातील जैसलमैर सीमेवर कर्तव्य बजावत असलेल्या सैनिकांना पाठवण्यात येणार आहेत.‘एक राखी जवानांसाठी’ हा उपक्रम कोपरगाव तालुक्यापुरता मर्यादित न राहता तो देशव्यापी व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करून या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले .
यावेळी  माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष युवराज गांगवे, उपाध्यक्ष मारुती कोपरे, सहसचिव सचिन चोळके, मधुकर इनामके, छबुलाल पवार, रवींद्र आचारी, विजय वाघ, नानासाहेब गाडेकर, अमित राजपूत, विक्रम सोनावणे, सागर शेंडगे, नितीन ढोमसे, किशोर जगताप, अनंत डिके, किशोर जऱ्हाड, पंकज झावरे, इरफान शेख, सुधाकर जाधव, विजय जाधव, राजू कदम, विजय कदम, विठ्ठल टुपके, तुकाराम रणशूर, राजेंद्र धुमाळ तसेच शिक्षक दिनानिमित्त श्वेतांबरी राऊत, चंदनशिव, श्रीमती शेख यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात माजी सैनिकांना एसएसजीएम महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींच्या हस्ते राख्या बांधण्यात आल्या.
युवराज गांगवे व  मारुती कोपरे यांनी संजीवनी युवा प्रतिष्ठानचा  ‘एक राखी जवानांसाठी’ हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे सांगून विवेक कोल्हे यांच्या कार्याचे कौतुक करताना  माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी दूरदृष्टी ठेवून कोपरगावात संजीवनी सैनिक स्कूल व प्रि-कॅडेट ट्रेनिंग सेंटर सुरू केल्याने या भागातील शेतकऱ्यांची व सर्वसामान्य कुटुंबातील हजारो तरुणांना सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. 
प्रास्ताविक सिद्धार्थ साठे तर आभार प्रदर्शन अनुराग येवले यांनी केले. प्रारंभी अमर जवान स्मृतिचिन्ह, भारतमाता व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

 चौकट

 यंदाची दिवाळी  सैनिकांच्या कुटुंबासोबत

 सैनिकांना दिवाळी, दसरा, रक्षाबंधन असा कोणताही सण, उत्सव आपल्या कुटुंबासोबत साजरा करता येत नाही. त्यामुळे संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने सैनिकांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबासोबत दिवाळी सण साजरा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. 

या ह्रदयस्पर्शी सोहळ्यास  विवेक कोल्हे, अमृत संजीवनीचे  अध्यक्ष पराग संधान,  राजेंद्र सोनवणे,  रवींद्र पाठक, विजय आढाव, विजय वाजे, स्वप्निल निखाडे, भाजयुमोचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, सुनील देवकर, सद्दाम सय्यद, खालिक कुरेशी, आकाश वाजे आदींसह आजी-माजी सैनिक, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

You cannot copy content of this page