निरोगी डोळ्यासाठी मोबाईल व सोशल मीडियापासून दूर राहा डॉ – सोनल वाबळे

निरोगी डोळ्यासाठी मोबाईल व सोशल मीडियापासून दूर राहा डॉ – सोनल वाबळे

Stay away from mobile and social media for healthy eyes Dr – Sonal Vable

डोळ्यांची काळजी’ विषयावर व्याख्यानLecture on Eye Care’

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onTue 5Sep24,20.30Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव: उद्याचा सुदृढ व सशक्त भारत निर्माण करण्याची ताकद विद्यार्थ्यांमध्ये असल्याने त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे प्रामुख्याने निरोगी डोळ्यासाठी सकस आहार व व्यायामाबरोबरच मोबाईल व इतर सोशल मीडियापासून विद्यार्थ्यांनी दूर राहिले पाहिजे असे आवाहन येथील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ. सोनल वाबळे यांनी के जे सोमय्या कॉलेजातील “डोळ्यांची काळजी’ या व्याख्यानात मानवी जीवनात डोळ्याचे महत्व विषद करतांना साथीच्या आजारापासून डोळ्यांची निगा कशी राखावी यावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करताना केले अध्यक्षस्थानी शोभाताई रोहमारे या होत्या.

सध्या डोळ्यांच्या आजारांची साथ मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने सोमय्या व रोहमारे कॉलेजात स्टुडंट मेंटेरिंग प्रोग्राम अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या संयुक्त विद्यमाने “डोळ्यांची काळजी” हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते
सौ. शोभाताई रोहमारे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी हितगुज साधतांनाच डॉक्टरांनी दिलेल्या अनमोल मार्गदर्शनाचा आपल्या जीवनात अंगीकार करावा व डोळ्यांची तसेच आरोग्याची काळजी घेण्यास सांगितले

कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष अशोक रोहमारे, विश्वस्त संदिप रोहमारे, प्राचार्य डॉ. बी. एस. यादव हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रो.(डॉ) विजय ठाणगे यांनी महाविद्यालयात राबवित असलेल्या विद्यार्थी केंद्रित अनेक योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वर्षा आहेर यांनी तर आभार प्रदर्शन स्टुडेन्ट मेंटोरिग प्रोग्राम चे समन्वयक डॉ. रवींद्र जाधव यांनी केले. याप्रसंगी प्रो.(डॉ) संतोष पगारे, डॉ.सुरेखा भिंगारदिवे, प्रा. रोहन यादव, प्रा. मुकेश माळवदे, प्रा. अजित धनवटे, प्रा. सोनाली आव्हाड, प्रा. स्वागत रणधीर यांच्यासह महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page