उद्धव ठाकरे शेताच्या बांधावर! दुष्काळग्रस्त भागाची पाहणी; ऐकल्या शेतकऱ्यांच्या व्यथा

उद्धव ठाकरेशेताच्या बांधावर!दुष्काळग्रस्त भागाची पाहणी; ऐकल्या शेतकऱ्यांच्या व्यथा

Uddhav Thackeray on the farm dam! inspection of drought affected areas; Heard the pains of the farmers

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onFir 8Sep24, 20.00Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : साहेब दुष्काळांनी वेढलं आहे ,खरिपाची पीक जळून गेले, उभी पिके आडवी झाली, नुकसान मोठा झाले, आम्ही खायचं काय आणि करायचं काय असा प्रश्न आमच्या समोर उभा ठाकला आहे ,अशी विनवणीच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोर शेतकऱ्यांनी केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या या विषयांमध्ये शेतकऱ्यांना तुम्ही खच नका, धीर धरा, आम्ही आपल्या पाठीशी आहोत, तुम्हाला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही असे ठाकरे यांनी शेतकऱ्यांना धीर देत विश्वास दिला. शिवसेना तुमच्या सोबत आहे तुमचे प्रश्न घेऊन आपण वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू ,सरकारला आपण एक मुदत देऊ, जाब विचारू जर त्याची दखल घेतली नाहीतर आंदोलन सुद्धा करू असा इशारा ठाकरे यांनी यावेळी दिला. दरम्यान या दौऱ्याच्या वेळी जोरदार पाऊस सुरू झाला भर पावसात उद्धव ठाकरे शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी बांधावर गेले.

शिर्डी विमानतळावर उद्धव ठाकरे यांचे आगमन झाल्यानंतर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत ठाकरे यांचे जोरदारपणे स्वागत केले. जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी हा परिसर दणावून गेला होता उद्धव साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा दिल्या.

उद्धव ठाकरे हे संगमनेरच्या दिशेने जात असताना काकडी गावामध्ये ग्रामस्थांनी त्या ठिकाणी त्यांना थांबण्याची विनंती केली या वेळेला ठाकरे यांनी त्यांना प्रतिसाद देत तेथील काकडी ग्रामस्थांची संवाद साधला यावेळी शेतकरी महिलांनी त्यांच्याकडे विषय केला आम्हाला नुकसान भरपाई मिळालेली नाही दुष्काळ पडलेला आहे आम्ही शासनाच्या शासन आपल्या दारी गेलो मात्र आम्हाला न्याय मिळाला नाही आम्हाला तेथे साधे स्टेजवर सुद्धा बोलवले नाही, या कार्यक्रमासाठी डाम ‘डोल करून पैसे खर्च केले जातात मात्र आम्हाला दिले जात नाही, आमच्या व्यथा सुद्धा ऐकला नाही, दुष्काळी परिस्थिती झालेली आहे आम्हाला न्याय द्यावा अशी विनंती त्यांनी यावेळी केली त्यावेळेला उद्धव ठाकरे यांनी तुम्ही धीर धरा , जर पाऊस पडला तर पिके उभे राहतील का असे उद्धव ठाकरे यांनी विचारल्यावर शेतकऱ्यांनी नाही म्हणून सांगितले पिकाचे नुकसान झालेच आहे असे ते म्हणाले. यावेळी शेतकऱ्यांनी आम्ही पिकासाठी कर्ज घेतलं होतं ते परत कसे पडायचं असा आमच्यापुढे प्रश्न आहे असे ते म्हणाले यावर उद्धव ठाकरे यांनी मी येथे आश्वासन द्यायला आलेलो नाही तुम्हाला ठामपणे विश्वास देतो आम्ही तुमच्या पाठीशी आहोत निश्चितपणे मार्ग काढू असे ते म्हणाले. यावेळी ठाकरे यांनी मागच्या वेळेला पंचनामे झाले मात्र त्याचे पैसे अद्याप पर्यंत दिले गेले नाही, याही वर्षी दुष्काळ आहे. शासन आपल्या दारी आले मग त्यांनी काय केले असा सवालच उद्धव ठाकरे यांनी यावेळी विचारला त्यावेळेला ग्रामस्थांनी शासन आमच्या जमिनीवर आले साधी भेट पण दिली नाही असे ते म्हणाले.

यावेळी काकडी येथील ग्रामस्थांनी आम्ही विमानतळासाठी जागा दिली मात्र आमचे अद्याप पर्यंत पैसे पूर्णपणे दिले गेले नाही ते पैसे आम्हाला दिले तर आमचा प्रपंच उभा राहील असे ग्रामस्थ म्हणल्यानंतर या संदर्भामध्ये उद्धव ठाकरे यांनी या विषयासंदर्भात विधिमंडळामध्ये तसेच केंद्र सुद्धा आपण याबद्दल आवाज उठवू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले

संगमनेर तालुक्यामध्ये वडझरी खुर्द या ठिकाणी ग्रामस्थांची संवाद साधताना या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी विजेची बिले वेळेवर येतात मिळते की नाही, त्यावर ग्रामस्थांनी आम्हाला वीजच मिळत नाही फक्त बिले मिळतात असे ते म्हणाले. तुम्हाला या मोसमा मध्ये किती वेळा पेरणी करावी लागली असे उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना विचारले त्या वेळेला त्यांनी दुबार आम्हाला पेरणी करावी लागली असे ते म्हणाले, त्यामुळे तुमचे कर्ज सुद्धा वाढले असे ते म्हणाले आम्हाला भिमाचे पैसे मिळाले नाही असे एका शेतकऱ्याने सांगितल्यावर उद्धव ठाकरे यांनी मागच्या वेळेला पाऊस पडला त्याचा मोबदला मिळाला नाही आताही तीच परिस्थिती हा सगळा फसवा प्रकार सुरू आहे, आता रिमझिम पाऊस पडतोय लोक म्हणतील मी पावसात आलो तसे नाही, या पावसाचा तुम्हाला काही उपयोग आहे का असा सवाल त्यांनी शेतकऱ्यांना विचारला, तुम्ही जर एकरी लागवड केली तर तुम्हाला खर्च किती येतो असे त्यांनी शेतकऱ्यांना विचारल्यावर शेतकऱ्यांनी 50 हजार रुपये खर्च येतो असे सांगितले. शेतकऱ्यांनी यावेळी आम्हाला पाणी मिळत नाही ते टॅंकरने आणावे लागते त्यासाठी सुद्धा खर्च येतो, साधारणता अडीच हजार रुपये टॅंकरला लागतात तो टँकर आठ दिवस सुद्धा पुरत नाही,

यावेळी संगमनेर तालुक्यातील तळेगाव गावामध्ये उद्धव ठाकरे यांनी भेट दिल्यानंतर येथील ग्रामस्थांनी त्यांच्याशी संवाद साधला आम्हाला येथे पाणी नाही पाण्यासाठी सुद्धा येथे राजकारण केलं जातं पिण्याचे पाणी आम्हाला वेळेवर मिळत नाही आम्हाला न्याय मिळवून द्या अशी मागणी त्यांनी केली यावेळी उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला निश्चितपणे न्याय मिळवून देऊ त्यासाठीच मी इथे आलो आहे असे त्यांनी सांगितले,

पीक कर्जाच्या नोटीसा नेमके कुणाला आले असे विचारणा उद्धव ठाकरे यांनी केली त्या वेळेला निलेश याले दोन लाखाचे कर्ज बँक ऑफ बडोदा चे घेतले होते, पैसे भरले नाही म्हणून मला नोटीस दिली तर दुसऱ्याने आम्हाला गुजरातच्या बँकेने सुद्धा आम्हाला नोटीस बजावली आहे आम्ही पैसे भरले नाही म्हणून आम्हाला ते नोटीस देत आहेत यावेळी ठाकरे यांनी गुजरातचे लोक तुम्हाला नोटीस देतात मात्र इथे तुमची व्यथा ऐकायला येत नाही का असा प्रश्न त्यांना विचारला.

राहता तालुक्यातील केलवड गावात राऊत वस्ती या ठिकाणी परिसराची पाहणी ठाकरे यांनी केली यावेळी या ठिकाणी बापू राऊत व आत्माराम गमे यासह शेतकऱ्यांचा भावना त्यांनी जाणून घेतल्या. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांना आमच्याकडे वीज मिळत नाही पाणी नाही पिके सगळी करपून गेली मागची भरपाई सुद्धा आम्हाला मिळाली नाही ती आम्हाला तात्काळ मिळावी अशी मागणी सुद्धा त्यांनी यावेळी ठाकरे यांच्या समोर केली यावेळी उद्धव ठाकरे यांनी पिकांचे नुकसान झाले तुमच्याकडे पंचनामे वेळेवर झाले की नाही ,अशी विचारणा त्यांनी केली त्यावर शेतकऱ्यांनी उशिराने पंचनामा केले आहे असे सांगितले तर दुसरीकडे दुबार पेरणीचे संकट आमच्यावर सुद्धा आले आमची पिके करपून गेली खूप नुकसान झाले कालपासून थोडाफार पाऊस सुरुवात झाल्या पण हातातोंडाशी आलेला घास आमचा गेला अशी व्यथा शेतकऱ्यांनी मांडली, त्यावर ठाकरे यांनी तुम्ही धीर धरा तुमच्या प्रश्नांची सोडवणूक निश्चितपणे केली जाईल असा विश्वास त्यांना यावेळी दिला.

राहता तालुक्यातील कोराळे या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि पावसामध्ये शेतकऱ्यांची संवाद साधला तुम्हाला आमच्या सरकारने दोन लाख रुपयांची कर्जमाफी पिकाची दिली होती ती तुम्हाला मिळाली की नाही त्यावेळेला त्या शेतकऱ्यांनी होय असे उत्तर दिले मात्र त्यानंतर आम्हाला आता पुन्हा कर्ज झाले आहे बँकांच्या नोटिसा येऊ लागलेल्या आहेत बँक ऑफ बडोदा ने आम्हाला नोटीस बजावल्याचे बाळासाहेब कानकाटे यांनी सांगितले. या ठिकाणी शेतकऱ्यांनी आम्हाला भरपाई मिळाली पाहिजे अशी मागणी केली आम्हाला पैसे देऊन टॅंकरने पाणी घ्यावे लागते मग सरकारकडे टँकर नाही का असा प्रश्न उपस्थित केल्यावर उद्धव ठाकरे यांनी तात्काळ तहसीलदारांना यांना पिण्याचे पाण्याचे टँकर उपलब्ध करून द्या अशा प्रकारच्या सूचना केल्या. उद्धव ठाकरेंनी ज्याचं शेत आहे त्या शेताच्या बांधावर जाऊन हे पीक तुम्हाला परत घेता येईल का असा प्रश्न केला त्यावर शेतकऱ्यांनी नाही म्हणाले आमचं नुकसान झालं आहे हे त्यांना या ठिकाणी दाखवून दिल. यावेळी मुकुंद रानमाळे यांनी पीक विम्याच्या पैशाच्या संदर्भामध्ये विम्याचे पैसे अध्यापन मिळाले नाही असा विषय मांडला.

यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत खासदार विनायक राऊत, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर ,राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, शिर्डी लोकसभा संपर्क नेते बबनराव घोलप ,  आमदार शंकरराव गडाख, आमदार सुनील शिंदे, ,माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, उपनेते साजन सातपुते ,जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे,व जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी, जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे , उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड ,शहर प्रमुख संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे ,जिल्हाप्रमुख मुजीब शेख, प्रमुख माजी महापौर भगवान फुलसौंदर् ,माजी जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे, शिवसेना नेते नितीनऔताडे ,उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले, राजेंद्र पठारे, माजी विश्वस्त सचिन कोते, नाना बावके, उपजिल्हा प्रमुख देविदास सोनवणे, जिल्हा प्रमुख ग्राहक संरक्षण कक्ष, अशोक थोरे,माजी उपजिल्हा प्रमुख, अरुण पाटील, तालुका प्रमुख विजय बडाख,तालुका प्रमुख विजय गव्हाणे, उपतालुकाप्रमुख प्रदीप वाघ, शिवसेना नेते संजय चल्लारे,तालुका संघटक सुधीर तावडे,तालुका प्रमुख सचिन कोते, शहर प्रमुख संजय शिंदे,माजी जिल्हाप्रमुख सुहास वहाडणे, शिवसेना नेते अनिल नाळे, आबासाहेब नले,  शहर प्रमुख महेश कुलकर्णी, भास्कर मोटकर भागवत लांडगे,सागर लोटे ,उपनगराध्यक्ष संजय छल्लारे सुधीर वायखिंडे,तेजस बोरावके, संजय साळवे, सिद्धांत छल्लारे मुकुंद सिंनगर, कलविंदर सिंग दडियाल, भरत मोरे, किरण खर्डे, इरफान पठाण, विकास शर्मा, दिलीप आरगडे आदी उपस्थित होते.

आदी उपस्थित होते.

चौकट

पावसात उद्धव ठाकरे गेले बांधावर

पावसात उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांची केली विचारपूस केली स्वतः पावसामध्ये बांधावर उतरून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला पावसामध्ये आपल्याला भेटण्यासाठी उद्धव ठाकरे आले आहे. याचाही आनंद शेतकऱ्यांचा चेहऱ्यावर दिसून आला तर शेतकऱ्यांनी यावेळी अनेक प्रश्न भर पावसात उपस्थित केले. पाणी, पीक विमा, यासारखे प्रश्न राहत्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी यावेळी उपस्थित केल्यावर या संदर्भात संबंधित यंत्रणेची तात्काळ बोलून तुम्हाला दिलासा दिला जाईल याची व्यवस्था करून शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असा विश्वासही त्यांना दिला.

चौकट

लहान मुलाने दिली ठाकरे यांना शिदोरी

काकडी या ठिकाणी कार्तिक वर्पे या इयत्ता सहावीच्या मुलाने उद्धव ठाकरे यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली त्यावेळेला आवर्जून ठाकरे यांनी त्याची भेट घेतली अरे तू इथे आला शाळेत गेला नाही का असे त्यांनी आपुलकीने विचारले, त्या वेळेला मी तुम्हाला भेटायला आलो असे कार्तिक म्हणाला, त्या वेळेला उद्धव ठाकरे यांनी तू आला जेवला का त्या वेळेला मी तुमच्यासाठ
शिदोरी घेऊन आलो आहे असे सांगितले व त्याने ती शिदोरी ठाकरे यांना दिली.

मी तुमच्या सोबतच

सरकार असो वा नसो ताई, तुम्ही सगळेजण माझ्यासोबत आहात मला कसली फिकीर नाही, मी तुमच्या बरोबर आहे. तुम्हाला न्याय मिळवून देणारच तुमच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा निश्चितपणे सोडवू असे उद्धव ठाकरे यांनी संगमनेर तालुक्यातील तळेगाव येथे एका महिलेला त्यांनी सांगून तिला सुद्धा अभिवादन केले तो एक चर्चेचा विषय ठरला.

चौकट

राहता, शिर्डी ,पुणतांबा या सर्व भागांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या दौरा चालू झाला असताना जोरदार पावसाने हजेरी लावली. उद्धव ठाकरे यांनी पावसाचा शेतकऱ्यांची संवाद साधला व दुसरीकडे सुद्धा पदाधिकारी कार्यकर्ते हे सुद्धा पावसामध्ये छत्र्या घेऊन या ठिकाणी येत होते आजूबाजूचे नागरिक सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करत होते त्यामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह पाहायला मिळाला.

Leave a Reply

You cannot copy content of this page